भगवान विष्णूंनी कश्यप अवतार घेतला होता, त्यामुळे ज्या ठिाकणी कासव असेल तिथे लक्ष्मी नक्कीच येते. आजकाल बहुतांश लोकांच्या हातात कासवाची अंगठी दिसते.
ज्योतिष आणि वास्तू यांवर संशोधन करणाऱ्या ज्योतिषी आणि वास्तू तज्ञांच्या मते, कासवाचा संबंध भगवान विष्णूच्या कश्यप अवताराशी आहे आणि विष्णू जिथे राहतात तिथे माता लक्ष्मी स्वतः त्यांच्या सेवेत हजर असते. त्यामुळे शुक्रवारी किंवा अक्षय्य तृतीया, दिवाळी, धनत्रयोदशी इत्यादी सण तसेच, शुभ तिथींना कासवाची अंगठी धारण केल्याने व्यक्तीला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
असे मानले जाते की, जर एखाद्याची इच्छा पूर्ण होत नसेल तर इच्छा पूर्ण करण्यासाठी कोऱ्या कागदावर लाल पेनने आपली इच्छा लिहून ती धातूपासून बनवलेल्या कासवाच्या आत ठेवावी. हे कासव उत्तर दिशेला ठेवावे. असे केल्याने ४० ते ६० दिवसात मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता असते.
कासवाला वास्तु शास्त्रातही मानाचे आणि पवित्र स्थान दिले गेले आहे. घरात किंवा ऑफिसमध्ये कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. सध्या घरोघरी काचेचे किंवा धातूचे कासव दिसते. कासवाला लक्ष्मी आणि कुबेर यांचाही आशिर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे घरात सकारात्मक उर्जा राहते आणि धन आणि धान्य प्राप्त होते.
वास्तुदोष किंवा आरोग्यासंबंधी समस्या असल्यास किंवा धनप्राप्तीमध्ये काही अडथळे येत असल्यास घरात कासव ठेवल्याने त्या सर्व समस्या दूर होतात. सोबतच घरामध्ये कासव ठेवल्याने व्यवसाय आणि नोकरीतील अडथळे, असुरक्षितता, अस्थिरता आणि नशीबाचा अभाव दूर करते. कोणत्याही कामात वारंवार व्यत्यय येत असेल, त्यामुळे काम पूर्ण होत नसेल, तर कासवाच्या तळाशी लक्ष्मी यंत्र कोरलेले धातूचे कासव पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवून ते उत्तर दिशेला ठेवावे. असे केल्याने अशक्य वाटणारी कामेही पूर्ण करता येतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या