Gautam Gambhir : ना वागणूक ना चांगले शब्द… गंभीरला पत्रकार परिषदेला पाठवू नका, मांजरेकरांचा BCCI ला सल्ला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Gautam Gambhir : ना वागणूक ना चांगले शब्द… गंभीरला पत्रकार परिषदेला पाठवू नका, मांजरेकरांचा BCCI ला सल्ला

Gautam Gambhir : ना वागणूक ना चांगले शब्द… गंभीरला पत्रकार परिषदेला पाठवू नका, मांजरेकरांचा BCCI ला सल्ला

Nov 11, 2024 06:10 PM IST

Sanjay Manjrekar On Gautam Gambhir : कोणत्याही दौऱ्यावर जाण्यापूर्वी संघाचे प्रशिक्षक किंवा कर्णधार पत्रकार परिषद घेतात. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी रोहित पत्रकार परिषदेत सहभागी झाला नाही, यावेळी फक्त गंभीरनेच हजेरी लावली. गंभीरने आपल्याच शैलीत या प्रश्नांना धीटपणे उत्तरे दिली.

गौतम गंभीरकडे योग्य वागणूक आणि शब्द नाहीत, त्याला पत्रकार परिषदेला पाठवू नका, मांजरेकरांचा BCCI ला सल्ला
गौतम गंभीरकडे योग्य वागणूक आणि शब्द नाहीत, त्याला पत्रकार परिषदेला पाठवू नका, मांजरेकरांचा BCCI ला सल्ला

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत गंभीरने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

या पत्रकार परिषदेनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी गंभीरबाबत बीसीसीआयला विशेष आवाहन केले आहे. बीसीसीआयने गंभीरला पत्रकार परिषदेला पाठवू नये, असे मांजरेकर यांनी म्हटले आहे.

कोणत्याही दौऱ्यावर जाण्यापूर्वी संघाचे प्रशिक्षक किंवा कर्णधार पत्रकार परिषद घेतात. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी रोहित पत्रकार परिषदेत सहभागी झाला नाही, यावेळी फक्त गंभीरनेच हजेरी लावली. गंभीरने आपल्याच शैलीत या प्रश्नांना धीटपणे उत्तरे दिली.

गंभीरला पत्रकार परिषदेला पाठवू नका

पण, गंभीरला पत्रकार परिषदांपासून दूर ठेवून पडद्याआड ठेवणेच बीसीसीआयसाठी योग्य ठरेल, असे मांजरेकर म्हणाले. सोशल मीडिया साइड एक्सवर पोस्ट करत मांजरेकर यांनी लिहिले की, "आत्ताच गंभीरची पत्रकार परिषद पाहिली. त्याला अशा जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवणे आणि पडद्याआड काम करू देणे हे बीसीसीआयसाठी चांगले होईल.

पत्रकार परिषदेत सहभागी होण्यासाठी त्याच्याकडे योग्य वागणूक आणि शब्द नाहीत. रोहित आणि आगरकर मीडियासमोर चांगले बोलतात.

न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर सर्वांच्याच रडारवर आहेत. न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा ३-० असा पराभव केला आहे. भारताला घरच्या मैदानावर तीन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानंतर गंभीरवर जोरदार टीका होत आहे. गंभीरला हटवल्याचीही चर्चा आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक असे आहे

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी – २२ ते २६ नोव्हेंबर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी – ०६ते १० डिसेंबर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी – १४ ते १८ डिसेंबर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी – २६ ते ३० डिसेंबर

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवी कसोटी – ०३ ते ०७ जानेवारी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

Whats_app_banner