एका ओळीच्या मेसेजमुळे संजू सॅमसनचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिकिट हुकलं? KCA अध्यक्षांचा मोठा खुलासा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  एका ओळीच्या मेसेजमुळे संजू सॅमसनचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिकिट हुकलं? KCA अध्यक्षांचा मोठा खुलासा

एका ओळीच्या मेसेजमुळे संजू सॅमसनचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिकिट हुकलं? KCA अध्यक्षांचा मोठा खुलासा

Jan 19, 2025 02:42 PM IST

KCA President on Sanju Samson : चॅम्पियन ट्रॉफी २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा झाली. या स्पर्धेतून संजू सॅमसन याला वगळण्यात आले.

एका ओळीच्या मेसेजमुळे संजू सॅमसनचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिकिट हुकलं? KCA अध्यक्षांचा मोठा खुलासा
एका ओळीच्या मेसेजमुळे संजू सॅमसनचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिकिट हुकलं? KCA अध्यक्षांचा मोठा खुलासा (PTI)

Sanju Samson Champions Trophy 2025 : चॅम्पियन ट्रॉफी २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा झाली. या यादीत संजू सॅमसन याचे नाव नसल्यामुळे चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसेच, संजूचे नाव चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात का नाही, यावरून चाहते प्रश्नही उपस्थित करत आहेत.

या सगळ्या दरम्यान, विजय हजारे ट्रॉफीकडे दुर्लक्ष केल्यामुळे संजूचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे तिकिट हुकल्याचे बोलले जात आहे. आता यावर केरळ क्रिकेट असोसिएशनचे (KCA) अध्यक्ष जयेश जॉर्ज यांनी विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ साठी संजू सॅमसन केरळ संघात का नव्हता याचा मोठा खुलासा आहे.

KCA च्या जॉर्ज यांनी केला खुलासा

या संदर्भात बोलताना केरळ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेश जॉर्ज म्हणाले की, संजू सॅमसनने विजय हजारे ट्रॉफीसाठी आपल्या अनुपस्थितीची माहिती केवळ एका ओळीच्या संदेशाद्वारे दिली होती.

"संजू सॅमसनने आम्हाला एका ओळीच्या मजकुराद्वारे कळवले की तो ३० जणांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी उपलब्ध राहणार नाही. हा त्याचा वैयक्तिक निर्णय होता. पण काही दिवसानंतर त्याने तो विजय हजारे ट्रॉफी खेळणार असल्याचे सांगितले.'

जॉर्ज पुढे म्हणाले, "आमचा नेहमी असा विश्वास आहे की सॅमसन संघाचा कर्णधार होण्यासाठी परिपूर्ण आहे, कारण तो आमचा व्हाइट बॉल क्रिकेट संघाचा कर्णधार आहे आणि त्याने SMAT हंगामातही कर्णधारपद भूषवले आहे. पण त्याची वृत्ती अशी आहे की तो तेव्हाच उपलब्ध असतो जेव्हा " त्याला हवे असते, यामुळे निवड प्रक्रियेवर परिणाम होतो."

संजू सॅमसन जबरदस्त फॉर्मात

भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. येथे दोन्ही संघांमध्ये ४ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली गेली. ज्यामध्ये संजू सॅमसन सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. सॅमसनने ४ सामन्यात ७२ च्या सरासरीने २१६ धावा केल्या. सॅमसनने या टी-20 मालिकेत २ शतके झळकावली होती.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या