आयपीएल २०२४ पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले. यानंतर मुंबई इंडियन्सचे चाहते चांगलेच निराश आहेत. आयपीएलच्या लाइव्ह सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
या दरम्यान, विविध प्रकारच्या बातम्याही समोर येत आहेत. आता अशीच काहीशी बातमी सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्य मारन आणि रोहित शर्माबाबत येत आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारनने रोहित शर्माला ब्लँक चेक ऑफर केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. पण या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे?
आयपीएल २०२५ आधी रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार असल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला रीलीज केल्यास सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन रोहितला ब्लँक चेक देण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे. पण अशा बातम्या निव्वळ अफवा असल्याचेही काही जणांचे मत आहे. पण असे असले तरी आयपीएल २०२५ पूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये रोहित शर्मावर आल्यास पैशांचा पाऊस पडू शकतो हे मात्र निश्चित आहे.
मीडिया रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे, की सध्या मुंबई इंडियन्स संघाचे वातावरण चांगले नाही, त्यामुळे रोहित शर्माला संघातून रीलीज केले जाऊ शकते.
रोहित शर्माची गणना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. आतापर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे. आयपीएल २०११ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला खरेदी केले होते. तेव्हापासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. तथापि, रोहित मुंबई इंडियन्सपूर्वी डेक्कन चार्जर्स हैदराबादचा भाग होता.