धुंव्वादार खेळ दाखवूनही चॅम्पियन्स ट्रॉफीत संधी मिळाली नाही; करुण नायरने मनातल्या भावना बोलून दाखवल्या!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  धुंव्वादार खेळ दाखवूनही चॅम्पियन्स ट्रॉफीत संधी मिळाली नाही; करुण नायरने मनातल्या भावना बोलून दाखवल्या!

धुंव्वादार खेळ दाखवूनही चॅम्पियन्स ट्रॉफीत संधी मिळाली नाही; करुण नायरने मनातल्या भावना बोलून दाखवल्या!

Jan 30, 2025 01:13 PM IST

Karun Nair Champions Trophy : विजय हजारे करंडकात विक्रमी कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या करुण नायरची चॅम्पियन्स ट्रॉफी संघात निवड झाली नाही. यावर आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

करुण नायर
करुण नायर (PTI)

Karun Nair Reaction On Champions Trophy Selection : विजय हजारे करंडकात विक्रमी कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या करुण नायर यांची चॅम्पियन्स ट्रॉफी संघात निवड ण झाल्याने, अनेकांना आश्चर्य वाटत आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता क्रिकेटपटू करुण नायर म्हणाला की, ‘चॅम्पियन्स ट्रॉफी संघात सामील होण्याची मला कधीच अपेक्षा नव्हती. परंतु हो, मला कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची नक्कीच इच्छा आहे.’ 

करुण नायर याने नुकत्याच विजय हजारे ट्रॉफीमध्ये ३८९.५०च्या सरासरीने ७७९ धावा केल्या होत्या, त्यानंतर त्याची चॅम्पियन्स ट्रॉफी संघात निवड होईल, असे बोलले जात होते. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीही निवड करताना करुण नायरच्या नावाची चर्चा झालयाचे म्हटले होते. मात्र, त्याची निवड झाली नसल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

काय म्हणाला करुण नायर?

स्पोर्ट्स टुडेशी बोलताना करुण नायर म्हणाला की, ‘प्रामाणिकपणे सांगू तर, मी स्पर्धेपूर्वी याचा विचार करत नव्हतो. निदान माझ्यासाठी तरी ही गोष्ट खूप दूरची होती. पण मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाची स्वप्नं असतात, कल्पना असतात आणि तुम्हाला या गोष्टी साध्य करायच्या असतात. पण तुम्ही हा विचार करत नाही की, मी हे करू शकतो. आपण फक्त हा विचार करत राहतो की, आपल्याला ते करायचे आहे. पण ते खरंच होईल का, हा प्रश्न नेहमीच तुमच्या मनात असतो.’

Karun Nair : करुण नायर आज पुन्हा बरसला, विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी!

‘भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याचे माझे स्वप्न अजूनही कायम आहे. हे मी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. त्यामुळे खरं सांगायचं, तर माझ्या मनात एकच गोष्ट होती. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी माझ्या नावाचा संघात समावेश होईल किंवा माझ्या नावाचा विचार केला जाईल, असे मला कधीच वाटले नव्हते, म्हणून त्याबद्दल मी खरोखर आभारी आहे’, असे करुण नायर म्हणाला. 

सचिन तेंडुलकरने केले कौतुक!

महान फलंदाज सचिन तेंडुलकरने विजय हजारे करंडक स्पर्धेत करुण नायरच्या फलंदाजीतील सनसनाटी कामगिरीचे कौतुक केले आहे. तर, सचिन तेंडुलकरच्या तोंडून कौतुकाचे शब्द ऐकून, करुण नायर याने आपल्या आयडॉलप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि त्याच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे, असे म्हटले. 

करुण नायर याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आठ डावात ३८९.५०च्या सरासरीने ७७९ धावा करण्याचा विक्रम केला होता. यात त्याने पाच शतके आणि एक अर्धशतकही झळकावले. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून चर्चेत आला. हा विक्रम करुण त्याने निवड समिती आणि क्रिकेट तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या