Ranji Trophy Vidarbha vs Tamil Nadu, Quarter Final : करुण नायरने पुन्हा एकदा आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. त्याने विदर्भासाठी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शतक झळकावले आहे. रणजी ट्रॉफी २०२४-२५ चा दुसरा उपांत्यपूर्व सामना आज शनिवारपासून विदर्भ आणि तामिळनाडू यांच्यात खेळवला जात आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विदर्भाने पहिल्या डावात ६ बाद २६४ धावा केल्या होत्या. यादरम्यान करुणने शतक झळकावून एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर अथर्व तायडे आणि आदित्य ठाकरे लवकरच बाद झाले. ध्रुव शौरीलाही विशेष काही करता आले नाही. मात्र यानंतर करुण नायरने शानदार फलंदाजी केली.
दानिश मलेवार याने नायरला चांगली साथ दिली. मात्र, तो ७५ धावा करून बाद झाला. मात्र करुण नायरने शतक झळकावले आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत तो नाबाद राहिला.
खरंतर करुण नायरने शतक करून एक खास कामगिरी केली. त्याने विदर्भासाठी सलग दुसरे शतक झळकावले आहे. करुणने यापूर्वी हैदराबादविरुद्ध दुसऱ्या डावात १०५ धावा केल्या होत्या. आता उपांत्यपूर्व फेरीत तमिळनाडूविरुद्ध शतक ठोकले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत करुण नायरने १८० चेंडूंचा सामना करताना नाबाद १०० धावा केल्या. त्याच्या खेळीत १४ चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता.
विशेष म्हणजे, एकवेळ विदर्भाने अवघ्या ४४ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. करुण सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने शतक झळकावले आणि पहिल्या दिवशी संघाची धावसंख्या २६४ धावांवर नेली. सलामीवीर अथर्व शून्यावर बाद झाला.
ध्रुव शौरी २६ धावा करून बाद झाला. आदित्य ५ धावा करून बाद झाला. दानिशने ११९ चेंडूंचा सामना करत ७५ धावा केल्या. कर्णधार अक्षय वाडकर २४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
संबंधित बातम्या