Karun Nair : करुण नायर आज पुन्हा बरसला, विजय हजारे ट्रॉफीत फलंदाजीची सरासरी ७५२ वर पोहोचली
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Karun Nair : करुण नायर आज पुन्हा बरसला, विजय हजारे ट्रॉफीत फलंदाजीची सरासरी ७५२ वर पोहोचली

Karun Nair : करुण नायर आज पुन्हा बरसला, विजय हजारे ट्रॉफीत फलंदाजीची सरासरी ७५२ वर पोहोचली

Jan 16, 2025 07:20 PM IST

Karun Nair Batting In Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफीमध्ये भारतीय फलंदाज करुण नायरने पुन्हा एकदा शानदार खेळी केली. यावेळी त्याने स्फोटक शैलीत ८८ धावा फटकावल्या आणि फलंदाजीची सरासरी ७५२ पर्यंत नेली.

Karun Nair : करुण नायर आज पुन्हा बरसला, विजय हजारे  ट्रॉफीतील फलंदाजीची सरासरी गाठली ७५२ वर पोहोचली
Karun Nair : करुण नायर आज पुन्हा बरसला, विजय हजारे ट्रॉफीतील फलंदाजीची सरासरी गाठली ७५२ वर पोहोचली

Karun Nair 752 Batting Average : भारतीय फलंदाज करुण नायर विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ मध्ये एकामागून एक स्फोटक खेळी खेळताना दिसत आहे. आता विदर्भाचा कर्णधार नायरने महाराष्ट्राविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये स्फोटक खेळी करत फलंदाजीची सरासरी ७५२ वर नेली आहे. याआधी त्याने यावर्षी या स्पर्धेत ५ शतके झळकावली आहेत.

विशेष म्हणजे, आज करुण नायर पुन्हा एकदा नाबाद परतला. नायरने आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफीच्या ७ डावात फलंदाजी केली असून त्यात तो ६ वेळा नाबाद परतला आहे. नायरला महाराष्ट्राविरुद्धच्या उपांत्य फेरीत शतक झळकावता आले नाही पण त्याने संघासाठी महत्त्वाची खेळी खेळली आणि ८८* धावा केल्या.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नायरने ही खेळी स्फोटक पद्धतीने खेळली. त्याने ४४ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८८ धावा केल्या. या खेळीदरम्यान नायरचा स्ट्राईक रेट २०० होता. त्याच्या खेळीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली.

या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या विदर्भ संघाने ५० षटकांत ३ गडी गमावून ३८० धावा केल्या. संघाकडून सलामी देणाऱ्या ध्रुव शौरी आणि यश राठोड यांनी शतकी खेळी खेळली.

ध्रुवने १४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ११४ धावा केल्या. याशिवाय यशने १४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ११६ धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी २२४ धावांची भागीदारी केली.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये करुण नायर

करुण नायरने विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ मध्ये आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ७ डावात फलंदाजी करताना त्याने ७५२ च्या सरासरीने ७५२ धावा केल्या आहेत. यादरम्यान नायरने ५ शतके आणि १ अर्धशतक झळकावले आहे. नायर सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे, त्यामुळे टीम इंडियात त्याच्या पुनरागमनाच्या शक्यता वाढत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या