या दिवशी रंगणार WPL चा उद्घाटन सोहळा, कार्तिक आर्यन आणि सिद्धार्थ मल्होत्रा करणार परफॉर्म
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  या दिवशी रंगणार WPL चा उद्घाटन सोहळा, कार्तिक आर्यन आणि सिद्धार्थ मल्होत्रा करणार परफॉर्म

या दिवशी रंगणार WPL चा उद्घाटन सोहळा, कार्तिक आर्यन आणि सिद्धार्थ मल्होत्रा करणार परफॉर्म

Published Feb 20, 2024 09:59 PM IST

wpl 2024 opening ceremony : महिला प्रीमियर लीगचा सलामीचा सामना सुरू होण्यापूर्वी, बंगळुरूमध्ये उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. WPL च्या या उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड स्टार्स परफॉर्म करतील.

wpl 2024 opening ceremony
wpl 2024 opening ceremony

WPL 2024 Start Date : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2024) दुसऱ्या सीझनचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. WPL चा दुसरा सीझन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.या स्पर्धेचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या मैदानावर रंगणार आहे.

विशेष म्हणजे, हा सलामीचा सामना सुरू होण्यापूर्वी, बंगळुरूमध्ये उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. WPL च्या या उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड स्टार्स परफॉर्म करतील.

WPL 2024 च्या उद्घाटन समारंभात बॉलीवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कार्तिक आर्यन आपल्या परफॉर्मन्सने आग लावणार आहेत. महिला प्रीमियर लीगच्या सोशल मीडिया हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. उद्घाटन सोहळा सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होईल.

WPLT20 च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये कार्तिक आर्यनला टॅग करण्यात आले असून पोस्टवर हे किंगडम नाही तर क्वीनडम आहे, असे लिहिलेले आहे.

टाटा WPL 2024 चा उद्घाटन सोहळा जियो सिनेमा अॅप ((Jio Cinema App) आणि वर स्पोर्ट्स १८ च्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे.

दरम्यान. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनच्या उद्घाटन सोहळ्यात अभिनेत्री क्रिती सेनन आणि कियारा अडवाणी यांनी आपल्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. यासोबतच गायक एपी ढिल्लनने आपल्या गाण्याने मैदानात आग लावली होती.

महिला प्रीमियर लीग २०२४ चे सामने बेंगळुरू आणि मुंबईत खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा सलामीचा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १७ मार्च रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या