Vijay Hazare Trophy : कर्नाटक पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली, करुण नायरच्या विदर्भाचे स्वप्न भंगले
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Vijay Hazare Trophy : कर्नाटक पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली, करुण नायरच्या विदर्भाचे स्वप्न भंगले

Vijay Hazare Trophy : कर्नाटक पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली, करुण नायरच्या विदर्भाचे स्वप्न भंगले

Jan 18, 2025 10:08 PM IST

Vijay Hazare Trophy Final : विदर्भाचा कर्णधार करुण नायरने संपूर्ण मोसमात सर्वाधिक ७७९ धावा केल्या, तर सलामीवीर ध्रुव शौरेनेही उपांत्यपूर्व फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत सलग ३ शतके झळकावली. पण असे असूनही विदर्भाला ट्रॉफी जिंकता आली नाही.

Vijay Hazare Trophy : कर्नाटक पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली, करुण नायरच्या विदर्भाचे स्वप्न भंगले
Vijay Hazare Trophy : कर्नाटक पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली, करुण नायरच्या विदर्भाचे स्वप्न भंगले

Vijay Hazare Trophy Karnataka Vs Vidarbha Scorecard : कर्नाटक संघाने विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील कर्नाटकाने करुण नायरच्या विदर्भाचा ३६ धावांनी पराभव केला आणि पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना बडोद्याच्या कोटम्बी स्टेडियमवर खेळला गेला. कर्नाटकाने पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकून तामिळनाडूच्या विक्रमाची बरोबरी केली. 

विदर्भाचा कर्णधार करुण नायर याने या स्पर्धेत ५ शतकांसह ७७९ धावा ठोकल्या. तर विदर्भाचा सलामीवीर ध्रुव शौरी याने क्वार्टर फायनलपासून फायनलपर्यंत सलग तीन शतके ठोकली. पण असे असूनही विदर्भाला ट्रॉफी जिंकता आली नाही.

आज झालेल्या फायनलपर्यंत विदर्भाने यंदा या स्पर्धेतील एकही सामना गमावला नव्हता. तर कर्नाटकाने ग्रुप स्टेजमधील एक सामना गमावला होता.

या सामन्यात कर्नाटकने प्रथम फलंदाजी केली मात्र त्याची सुरुवात चांगली झाली नाही. १५व्या षटकातच कर्णधार मयंकसह तिन्ही आघाडीचे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले, तेव्हा धावसंख्या केवळ ६७ धावांवर होती.

कर्नाटकाच्या रविचंद्रन स्मरणचे शतक

 येथून २१ वर्षीय युवा फलंदाज रविचंद्रन स्मरणने जबाबदारी स्वीकारली आणि कृष्णन सृजितसोबत १६० धावांची मोठी आणि वेगवान भागीदारी केली. सृजित ७८ धावा करून बाद झाला, त्यानंतर स्मरणने अभिनव मनोहरसोबत १०६ धावांची भागीदारी केली. स्मरणने शानदार शतक झळकावले आणि १०१ धावा करून बाद झाला, तर मनोहरने अवघ्या ४२ चेंडूत ७९ धावा करत संघाला ३४८ धावांपर्यंत नेले.

विदर्भाने याआधीही स्पर्धेत मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला होता. त्यामुळे त्यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर अपेक्षित होते पण तसे होऊ शकले नाही. अवघ्या ३२ धावांवर संघाने पहिली विकेट गमावली, त्यानंतर कर्णधार करुण (२७) आला.

त्याच्याकडून आणखी एका उत्कृष्ट खेळीची अपेक्षा होती पण तो संघाच्या ८८ धावा झालेल्या असताना बाद झाला. .यंदा या स्पर्धेत तो केवळ दुसऱ्यांदा बाद झाला.

कर्नाटकसाठी हा मोठा धक्का होता आणि यानंतर येणारे खेळाडू काही काळ टिकून राहिले पण त्यांना मोठा डाव खेळता आला नाही. गेल्या सलग दोन सामन्यात शतके झळकावणाऱ्या ध्रुव शौरीने (११०) येथेही एकट्याने झुंज दिली आणि सलग तिसरे शतक झळकावले, पण तेही पुरेसे नव्हते. 

सरतेशेवटी हर्ष दुबेने अवघ्या ३० चेंडूत ६३ धावा करत संघाला लक्ष्याच्या जवळ नेले, मात्र तो बाद झाल्याने विदर्भाचा डाव ३१२ धावांवर संपुष्टात आला आणि त्यांचे पहिल्या विजेतेपदाचे स्वप्नही भंगले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या