विजय हजारे ट्रॉफी जिंकण्यासाठी विदर्भासमोर ३४९ धावांचे लक्ष्य, सर्वांची नजर करूण नायर याच्यावर
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  विजय हजारे ट्रॉफी जिंकण्यासाठी विदर्भासमोर ३४९ धावांचे लक्ष्य, सर्वांची नजर करूण नायर याच्यावर

विजय हजारे ट्रॉफी जिंकण्यासाठी विदर्भासमोर ३४९ धावांचे लक्ष्य, सर्वांची नजर करूण नायर याच्यावर

Jan 18, 2025 05:31 PM IST

Vijay Hazare Trophy Final : विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना विदर्भ आणि कर्नाटक यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात कर्नाटकाने प्रथम फलंदाजी करताना ३४८ धावांचा डोंगर उभारला आहे.

विजय हजारे ट्रॉफी जिंकण्यासाठी विदर्भासमोर ३४९ धावांचे लक्ष्य, सर्वांची नजर करूण नायर याच्यावर
विजय हजारे ट्रॉफी जिंकण्यासाठी विदर्भासमोर ३४९ धावांचे लक्ष्य, सर्वांची नजर करूण नायर याच्यावर

Karnataka Vs Vidarbha Vijay Hazare Trophy Final : विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ चा अंतिम सामना कर्नाटक आणि विदर्भ यांच्यात खेळला जात आहे. वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात विदर्भाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर कर्नाटकाने प्रथम फलंदाजी करताना ३४८ धावांचा डोंगर उभारला आहे.

कर्नाटकाकडून स्मरण रविचंद्रनने सर्वाधिक १०१ धावा केल्या. त्याने ९२ चेंडूंच्या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकार मारले.

अभिनव मनोहरने ७९ आणि कृष्णन सृजितने ७८ धावा केल्या. कर्णधार मयांक अग्रवालने ३१ आणि अनिश केव्हीने २३ धावांचे योगदान दिले. देवदत्त पडिक्कलने ८ धावा केल्या. 

विक्रमी पाचव्यांदा स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याकडे कर्नाटकचे लक्ष लागले आहे. उपांत्य फेरीत कर्नाटकने हरियाणाचा पराभव केला होता.

करुण नायर तुफान फॉर्मात

त्याचवेळी करुण नायरच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघाने महाराष्ट्राचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. विजय हजारे ट्रॉफी जिंकून विदर्भाला इतिहास रचण्याची संधी आहे. विदर्भाने कधीही हे विजेतेपद पटकावलेले नाही.

नायर सध्याच्या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत सात सामन्यांमध्ये ७५२ धावा केल्या आहेत, ज्यात ५ शतके आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. एक डाव वगळता तो सर्व डावात नाबाद राहिला.

विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात कोणत्याही कर्णधाराने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. दुसरीकडे, कर्नाटकचा कर्णधार मयंकही फॉर्मात आहे. त्याने चार शतकांच्या जोरावर ६१९ धावा केल्या आहेत.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

कर्नाटक- मयंक अग्रवाल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, अनीश केव्ही, स्मरण रविचंद्रन, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल, हार्दिक राज, प्रसीद कृष्णा, वासुकी कौशिक, अभिलाष शेट्टी.

विदर्भ- ध्रुव शौरे, यश राठोड, करुण नायर (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शुभम दुबे, अपूर्व वानखडे, हर्ष दुबे, नचिकेत भुते, यश कदम, दर्शन नळकांडे, यश ठाकूर.

Whats_app_banner

संबंधित बातम्या