Kapil Dev : दीपिका-रणवीर होते, पण कपिल देवला विसरले?; देशाला पहिला वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या कर्णधाराचा अपमान
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Kapil Dev : दीपिका-रणवीर होते, पण कपिल देवला विसरले?; देशाला पहिला वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या कर्णधाराचा अपमान

Kapil Dev : दीपिका-रणवीर होते, पण कपिल देवला विसरले?; देशाला पहिला वर्ल्डकप मिळवून देणाऱ्या कर्णधाराचा अपमान

Nov 20, 2023 01:20 PM IST

kapil dev not invited for world cup final 2023 : कपिल देव यांना वर्ल्डकप फायनल पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमंत्रित करण्यात आले नव्हते, यानंतर यावरून आता राजकारण तापले आहे.

Kapil Dev
Kapil Dev (PTI)

क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आणि वर्ल्डकप ट्रॉफी जिंकली. पण या वर्ल्डकप फायनलदरम्यान देशात एका नव्या वादाल तोंड फुटले आहे.

हा वाद १९८३ चे वर्ल्डकप विजेते कर्णधार कपिल देव यांच्याशी संबंधित आहे. कपिल देव यांना वर्ल्डकप फायनल पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमंत्रित करण्यात आले नव्हते, यानंतर यावरून आता राजकारण तापले आहे.

ते मला विसरले- कपिल देव

कपिल देव यांना याबबात विचारले असता, त्यांनी एका चॅनेलला सांगितले की, 'हा एक मोठा कार्यक्रम होता आणि लोक त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात व्यस्त होते. म्हणूनच ते माझ्यासारख्या माणसाला विसरले असतील".

कपिल देव म्हणाले की, "तुम्ही मला फोन केला, मी इथे आलो." त्यांनी फोन केला नाही, मी गेलो नाही. हे इतकं सोपं आहे. माझी संपूर्ण १९८३ विश्वचषक टीम तिथे असावी अशी माझी इच्छा होती. पण खूप कामं चालू आहेत. खूप जबाबदाऱ्या असतात, कधी कधी लोक विसरुन जातात".

शाहरूख-दीपिकाही नरेंद्र मोदी स्टेडियमवर

विशेष म्हणजे वर्ल्डकपच्या या अंतिम सामन्यात जगातील सर्वच वर्ल्डकप विजेते कर्णधार येणार, असे बोलले जात होते. पण तसे झाले नाही.

क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलसाठी अनेक हायप्रोफाईल लोक मैदानावर हजर होते. यामध्ये बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग इत्यादींच्या नावांचा समावेश आहे. माजी कर्णधार सौरभ गांगुली हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष असल्याने त्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या