
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेत न्यूझीलंडने २-० अशी विजयी आघाडी आहे. आता मालिकेतील तिसरा सामना १ नोव्हेंबरपासून मुंबईत खेळला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला अनुभवी फलंदाज केन विल्यमसनच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीप्रमाणेच तिसऱ्या कसोटीतही विल्यमसन न्यूझीलंडचा भाग होऊ शकणार नाही. कंबरेच्या दुखापतीमुळे विल्यमसन क्रिकेटपासून दूर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
न्यूझीलंड संघाने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका काबीज केली आहे. अशा स्थितीत मुंबईतील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचा निकाल काहीही लागला तरी न्यूझीलंड संघ मालिका चॅम्पियन म्हणून दौऱ्याचा शेवट करेल.
केन विल्यमसन इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी तंदुरुस्त होण्यासाठी मुंबईतील तिसऱ्या कसोटीसाठी भारतात येणार नाही, असे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड कसोटी मालिका २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
ब्लॅककॅप्सचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, विल्यमसनने चांगली कामगिरी केली आहे, परंतु सावध पवित्र्यामुळे त्याला इंग्लंड मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी वेळ मिळेल. केन विल्यमसन सातत्याने चांगले संकेत देत आहे, पण सध्या तो आमच्यासोबत खेळायला पूर्णपणे फिट नाही. परिस्थिती आशादायक दिसत असली तरी न्यूझीलंडमध्ये राहणे आणि पुनर्वसनाच्या अंतिम टप्प्यांवर लक्ष केंद्रित करणे हा त्याच्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. जेणेकरून तो इंग्लंडकडून खेळण्यास तयार होऊ शकेल. "
संबंधित बातम्या
