मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Most Centuries In Test : विराट कोहली मागे पडला, कसोटीत सर्वाधिक शतकांच्या बाबतीत मित्रानेच मागे टाकलं

Most Centuries In Test : विराट कोहली मागे पडला, कसोटीत सर्वाधिक शतकांच्या बाबतीत मित्रानेच मागे टाकलं

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 04, 2024 11:55 AM IST

Kane Williamson Virat kohli Most Test Centuries : पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडने २ बाद २५८ धावा केल्या केन विल्यम्स ११२ आणि रचिन रविंद्र ११८ हे नाबाद परतले आहेत. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २१९ धावांची भागिदारी केली.

Kane Williamson Virat kohli
Kane Williamson Virat kohli

Williamson Surpassed kohli in Most Test Centuries : न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना आजपासून (४ फेब्रुवारी) सुरू झाला आहे. 

या सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडच्या एका फलंदाजाने कसोटीत सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे हा फलंदाज विराट कोहलीचा चांगला मित्र आहे. या महान फलंदाजाने मागील ९ कसोटी डावांमध्ये ५ शतके झळकावली आहेत. केन विल्यमसन असे या महान फलंदाजाचे नाव आहे.

या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांनी शतके झळकावून या मालिकेची धमाकेदार सुरुवात केली आहे. 

पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडने २ बाद २५८ धावा केल्या केन विल्यम्स ११२ आणि रचिन रविंद्र ११८ हे नाबाद परतले आहेत. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २१९ धावांची भागिदारी केली.

दरम्यान, केन विल्यमसनचे कसोटी कारकिर्दीतील हे ३० वे शतक आहे. यासह तो कसोटीत सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत विराट कोहलीच्या पुढे गेला आहे. विराटने आतापर्यंत कसोटीत २९ शतके झळकावली आहेत. यासह विराट कोहली कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फॅब फोरच्या यादीत तळाशी गेला आहे.

फॅब-फोरमध्ये सर्वाधिक कसोटी शतके 

स्टीव्ह स्मिथ - ३२ शतके (१०७ सामने)

केन विल्यमसन - ३०* शतके (९७ सामने)

जो रूट – ३० शतके (१३७ सामने)

विराट कोहली - २९ शतके (११३ सामने)

सर्वात जलद ३० कसोटी शतके झळकावणारे फलंदाज 

१५९ डाव - सचिन तेंडुलकर

१६२ डाव - स्टीव्ह स्मिथ

१६७ डाव – मॅथ्यू हेडन

१६९ डाव - केन विल्यमसन

१७० डाव - रिकी पाँटिंग

१७४ डाव – सुनील गावस्कर

रचिन रवींद्रने पहिले कसोटी शतक झळकावले

२०२३ च्या विश्वचषकात आपली छाप सोडणारा युवा खेळाडू रचिन रवींद्रचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतकही झळकावले आहे. रचिन रवींद्रने १८९ चेंडूंचा सामना करून १०० धावांचा टप्पा गाठला. यादरम्यान त्याने १०  चौकार आणि १ षटकार लगावला.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi