स्मिथ-विल्यमसननं शतकं ठोकली, तर टीम इंडियाचा किंग ३ धावांवर बाद, विराटला नेटकऱ्यांनी धुतलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  स्मिथ-विल्यमसननं शतकं ठोकली, तर टीम इंडियाचा किंग ३ धावांवर बाद, विराटला नेटकऱ्यांनी धुतलं

स्मिथ-विल्यमसननं शतकं ठोकली, तर टीम इंडियाचा किंग ३ धावांवर बाद, विराटला नेटकऱ्यांनी धुतलं

Dec 16, 2024 11:24 AM IST

Kane Williamson Virat Kohli Stats: बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील हा तिसरा कसोटी सामना आहे. गेल्या दोन सामन्यातही विराटला काही खास करता आले नाही. विराटच्या या फ्लॉप शो नंतर चाहत्यांनी त्याला रिटायर होण्याचा सल्ला दिली आहे. सोशल मीडियावर विराट कोहली चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.

स्मिथ-विल्यमसननं शतकं ठोकली, तर टीम इंडियाचा किंग ३ धावांवर बाद, विराटला नेटकऱ्यांनी धुतलं
स्मिथ-विल्यमसननं शतकं ठोकली, तर टीम इंडियाचा किंग ३ धावांवर बाद, विराटला नेटकऱ्यांनी धुतलं

Ind vs Aus Gabba Test : क्रिकेटमध्ये इंग्लंडचा जो रूट, भारताचा विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांना फॅब ४ म्हणून ओळखले जाते. पण सध्या या फॅब फोरमध्ये विराट कोहली खूपच मागे पडला आहे.

रूट, विल्यमसन, स्मिथ हे सातत्याने त्यांच्या संघासाठी चांगली कामगिरी करत आहेत. तर विराट कोहली मात्र, त्याच सातत्याने लगातार फ्लॉप होत आहे. विराट सध्या सुरू असलेल्या गाबा कसोटीच्या पहिल्या डावात ३ धावा करून बाद झाला.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील हा तिसरा कसोटी सामना आहे. गेल्या दोन सामन्यातही विराटला काही खास करता आले नाही. विराटच्या या फ्लॉप शो नंतर चाहत्यांनी त्याला रिटायर होण्याचा सल्ला दिली आहे. सोशल मीडियावर विराट कोहली चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.

केन विल्यमसनचं शतक

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना १४ डिसेंबरपासून हॅमिल्टन येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात किवी संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसन याने दमदार शतक झळकावले.

केन विल्यमसनच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३३ वे शतक होते. कसोटीतील शतकांच्या बाबतीत त्याने आता स्टीव्ह स्मिथची बरोबरी केली आहे. ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात स्मिथनेही शतक झळकावले.

विल्यमसन १५६ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने २० चौकार आणि १ षटकार लगावला. कसोटीत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत स्मिथसह केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर आहे. तर जो रूट ३६ कसोटी शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

विराट कोहली पुन्हा एकदा निराश झाला

पण भारताचा विराटकोहली सातत्याने फ्लॉप होत आहे. एकेकाळी भारतीय संघाचे रन मशिन म्हणवल्या जाणाऱ्या विराट कोहलीला आता सातत्यपूर्ण कामगिरी करता येत नाही. किंग कोहलीने अनेक वर्षांपासून सातत्याने मोठ्या खेळी खेळल्या आहेत, पण तो आता सातत्याने फ्लॉप होताना दिसत आहे.

सध्या सुरू असलेल्या ब्रिस्बेन कसोटीत स्टीव्ह स्मिथने शतक झळकावले. तर याच कसोटीत विराट कोहली ३ धावा करून बाद झाला. जोश हेझलवूडने त्याला पुन्हा एकदा ऑफ स्टंप बाहेरील चेंडूवर विकेटकीपरकरवी झेलबाद केले.

कोहलीच्या नावावर कसोटीत ३० शतके आहेत आणि फॅब फोर फलंदाजांच्या यादीत तो शेवटच्या स्थानावर आहे.

न्यूझीलंड-इंग्लंड सामन्याची अवस्था अशीच सुरू आहे

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या स्थितीत न्यूझीलंडने पहिल्या डावात ३४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात त्यांनी इंग्लंडला अवघ्या १४३ धावांवर ऑलआउट केले.

आता दुसऱ्या डावात वृत्त लिहेपर्यंत न्यूझीलंडने ७ बाद ४२२ धावा केल्या होत्या. सध्या किवी संघाकडे ६२६ धावांची आघाडी आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या