SA20 : विल्यमसनच्या षटकारामुळं प्रेक्षकाचं नशीब फळफळलं, पठ्ठ्या ९० लाख रुपये घरी घेऊन गेला, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SA20 : विल्यमसनच्या षटकारामुळं प्रेक्षकाचं नशीब फळफळलं, पठ्ठ्या ९० लाख रुपये घरी घेऊन गेला, पाहा

SA20 : विल्यमसनच्या षटकारामुळं प्रेक्षकाचं नशीब फळफळलं, पठ्ठ्या ९० लाख रुपये घरी घेऊन गेला, पाहा

Jan 11, 2025 11:17 AM IST

दक्षिण आफ्रिकेची टी-20 लीग SA20 चा थरार सुरू झाला आहे. याममध्ये मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी फलंदाजाने मारलेल्या षटकाराचा झेल घेतला, तर त्यांना ९० लाख रूपये बक्षीस म्हणून देण्यात येतात.

SA20 : विल्यमसनच्या षटकारामुळं प्रेक्षकाचं नशीब फळफळलं, पठ्ठ्या ९० लाख रुपये घरी घेऊन गेला, पाहा
SA20 : विल्यमसनच्या षटकारामुळं प्रेक्षकाचं नशीब फळफळलं, पठ्ठ्या ९० लाख रुपये घरी घेऊन गेला, पाहा

न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या SA20 मध्ये खेळत आहे. किवी फलंदाज या स्पर्धेत डरबन सुपर जायंट्सकडून खेळत आहे. विल्यमसनने स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात शानदार फलंदाजी केली. त्याने प्रिटोरिया कॅपिटल्स संघाविरुद्ध अर्धशतक ठोकले.

दरम्यान विल्यमसनने या खेळीदरम्यान एक षटकार असा ठोकला, ज्यामुळे सामना पाहायला आलेला प्रेक्षक लखपती झाला. वास्तविक, विल्यमसनने मारलेला षटकार प्रेक्षकांंमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने झेलला. यामुळे त्याला ९० लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.

दक्षिण आफ्रिका 20 स्पर्धेचा दुसरा सामना (१० जानेवारी) डरबन सुपर जायंट्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करत ४ बाद २०९ धावांची मोठी धावसंख्या फलकावर लावली. यादरम्यान विल्यमसनने ४० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६० धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.

या खेळीदरम्यान विल्यमसनने लेग साइडवर उत्तुंग षटकार मारला, जो स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी पकडला.

SA20 मध्ये प्रेक्षकाने एका हाताने झेल घेतल्यावर २ मिलियन रँडचे बक्षीस दिले जाणार आहे. विल्यमसनच्या षटकारावर घेतलेल्या झेलचा व्हिडिओ SA20 च्या माध्यमातून शेअर करण्यात आला. तसेच, ज्या व्यक्तीने एका हाताने हा झेल घेतला त्याला २ मिलियन रँड (सुमारे ९० लाख भारतीय रुपये) बक्षीस मिळाले.

डरबनने सामना दोन धावांनी जिंकला

डरबन सुपर जायंट्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात निकराची लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघांनी २०० धावांचा टप्पा ओलांडला, पण शेवटी डरबन सुपर जायंट्सने बाजी मारली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सुपर जायंट्स संघाने २० षटकांत ४ बाद २०९ धावा केल्या. यादरम्यान विल्यमसनने संघासाठी ६० धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. सुपर जायंट्सच्या या टोटलनंतर ते आरामात जिंकतील असे वाटत होते, पण प्रिटोरिया कॅपिटल्सकडून जबरदस्त झुंज पाहायला मिळाली.

लक्ष्याचा पाठलाग करताना प्रिटोरिया कॅपिटल्सने २० षटकांत ६ बाद २०७ धावा केल्या. संघाला केवळ २ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. संघाकडून सलामीला आलेल्या रहमानउल्ला गुरबाज याने सर्वात मोठी खेळी खेळली आणि ४३ चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८९ धावा केल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या