SL vs NZ : गॉल कसोटीत केन विल्यमसनच्या नावावर नकोसा विक्रम, ४ तासांत दोनदा बाद झाला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SL vs NZ : गॉल कसोटीत केन विल्यमसनच्या नावावर नकोसा विक्रम, ४ तासांत दोनदा बाद झाला

SL vs NZ : गॉल कसोटीत केन विल्यमसनच्या नावावर नकोसा विक्रम, ४ तासांत दोनदा बाद झाला

Updated Sep 28, 2024 04:46 PM IST

sl vs nz test day 3 highlights : न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीत पराभवाच्या मार्गावर आहे. श्रीलंकेने पहिला डाव ५ गड्यांच्या मोबदल्यात ६०२ धावांवर घोषित केला. याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव अवघ्या ८८ धावांवर आटोपला.

SL vs NZ : गॉल कसोटीत केन विल्यमसनच्या नावावर नकोसा विक्रम, ४ तासांत दोनदा बाद झाला
SL vs NZ : गॉल कसोटीत केन विल्यमसनच्या नावावर नकोसा विक्रम, ४ तासांत दोनदा बाद झाला (AFP)

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी कसोटी गाले येथे खेळली जात आहे. पहिल्या कसोटीत श्रीलंकेने न्यूझीलंडचा पराभव केला. त्याचवेळी, आता न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीत पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. 

श्रीलंकेने पहिला डाव ५ गड्यांच्या मोबदल्यात ६०२ धावांवर घोषित केला. याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव अवघ्या ८८ धावांवर आटोपला. यानंतर किवी संघ फॉलो ऑन खेळण्यासाठी मैदानात उतरला.

यानंतर तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ५ बाद १९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे न्यूझीलंडला डावाने पराभूत होण्याचा धोका आहे. सध्या किवी संघासाठी ग्लेन फिलिप्स आणि टॉम ब्लंडेल क्रीझवर आहेत.

केन विल्यमसन ४ तासांत दोनदा बाद झाला

त्याच वेळी, आज (२८ सप्टेंबर) न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विल्यमसन ४ तासांत दोनदा बाद झाला. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.२५ वाजले होते. यानंतर न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात केन विल्यमसन ४६ धावा करून बाद झाला. त्यावेळी स्थानिक वेळेनुसार दुपारचे २.१५ वाजले होते. अशाप्रकारे केन विल्यमसन २४ तासांत दोनदा बाद झाला. कसोटी फॉरमॅटमध्ये एखादा फलंदाज ४ तासांत दोनदा पॅव्हेलियनमध्ये परतण्याची घटना फार दुर्मिळ आहे.

गॉल कसोटीत आतापर्यंत काय घडले?

श्रीलंकेने पहिल्या डावात ५ विकेट गमावत ६०२ धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून कामेंदू मेंडिसने नाबाद १८२ धावांची खेळी केली. दिनेश चंडिमलने ११६ धावा केल्या. तर कुसल मेंडिसने १०६ धावांचे योगदान दिले. याशिवाय अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजने ८८ धावा केल्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३ बळी घेतले.

टीम साऊदीला १ विकेट मिळाली. त्याचवेळी न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ ८८ धावांवरच आटोपला. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने सर्वाधिक ६ बळी घेतले. तर निशान पेरिसला ३ विकेट मिळाले. याशिवाय असिता फर्नांडोने १ विकेट आपल्या नावावर केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या