मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  WI vs SA : रबाडा-यान्सेन यांच्यात टक्कर, सामना थांबवावा लागला, व्हिडिओ पाहून हादरून जाल!

WI vs SA : रबाडा-यान्सेन यांच्यात टक्कर, सामना थांबवावा लागला, व्हिडिओ पाहून हादरून जाल!

Jun 24, 2024 01:36 PM IST

kagiso rabada marco jansen : वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान, दक्षिण आफ्रिका संघाचे दोन खेळाडू कागिसो रबाडा आणि यानसेन झेल घेण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर एकमेकांना धडकले.

WI vs SA : रबाडा-यान्सेन यांच्यात भीषण टक्कर, सामना थांबवावा लागला, व्हिडीओ पाहून तुमचे होश उडातील
WI vs SA : रबाडा-यान्सेन यांच्यात भीषण टक्कर, सामना थांबवावा लागला, व्हिडीओ पाहून तुमचे होश उडातील

टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये सोमवारी (२४ जून) दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज यांच्यात सुपर ८ चा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान मैदानावर एक भयंकर अपघात घडला. दक्षिण आफ्रिकेचे दोन खेळाडू कागिसो रबाडा आणि मार्को यानसेन झेल घेण्याच्या प्रयत्नात एकमेकांना धडकले. दोघांनाही झेल घेता आला नाही.

मात्र, टक्कर झाल्यानंतर दोन्ही खेळाडू मैदानावर वेदनेने व्हिवळताना दिसले. सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही. ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वास्तविक, वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान, दक्षिण आफ्रिका संघाचे दोन खेळाडू कागिसो रबाडा आणि यानसेन झेल घेण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर एकमेकांना धडकले.

ट्रेंडिंग न्यूज

वेस्ट इंडिजच्या डावातील हे ८व्या षटकात ही घटना घडली. एडन मार्कराम गोलंदाजीवर काइल मेयर्सने चेंडू लाँग ऑफच्या दिशेने खेळला, तेथे मार्को यान्सेन तैनात होता, तर रबाडाही लाँग ऑनवर होता. त्यावेळी षटकार वाचवण्यासाठी दोन्ही खेळाडू धावले आणि एकमेकांवर आदळले

रबाडाच्या गुडघ्याला दुखापत झाली तर यान्सेनच्या छातीला आणि पोटाला मार लागला. दोघेही वेदनेने ओरडताना दिसले. फिजिओ टीम मैदानात आल्याने सामना काही काळ थांबवावा लागला.

वेस्ट इंडिज वर्ल्डकपमधून बाहेर

दरम्यान, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करून T20 विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीत धडक मारली. डकवर्थ लुईस नियमानुसार आफ्रिकेने हा सामना ३ गडी राखून जिंकला. दोघांमध्ये चुरशीची लढत झाली, त्यात पावसानेही हस्तक्षेप केला. हा लो स्कोअरिंग सामना होता, ज्यामध्ये अतीतटीची लढत पाहायला मिळाली.

शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला ५ धावांची गरज होती. मार्को यानसेनने २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून आफ्रिकेला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजने २० षटकांत ८ गडी गमावून १३५ धावा केल्या.

दुसऱ्या डावात पाऊस सुरू झाला, त्यामुळे आफ्रिकेला १७ षटकांत १२३ धावांचे लक्ष्य देण्यात आले, जे संघाने १६.१ षटकांत पूर्ण केले. सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला, ज्यामध्ये दोन्ही संघांनी जीवाची बाजी लावली. पण शेवटी आफ्रिकेने बाजी मारली.

WhatsApp channel