BAN vs SA Test : कागिसो रबाडाने मोठा विक्रम रचला, डेल स्टेन-वकार युनूस सर्वांना मागे टाकलं, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BAN vs SA Test : कागिसो रबाडाने मोठा विक्रम रचला, डेल स्टेन-वकार युनूस सर्वांना मागे टाकलं, पाहा

BAN vs SA Test : कागिसो रबाडाने मोठा विक्रम रचला, डेल स्टेन-वकार युनूस सर्वांना मागे टाकलं, पाहा

Updated Oct 21, 2024 01:25 PM IST

Kagiso Rabada Fastest 300 Test Wickets : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने जगभरातील गोलंदाजांना मागे टाकले आहे. कागिसो रबाडाने कसोटीत सर्वात जलद ३०० विकेट्स घेतल्या आहेत.

BAN vs SA Test : कागिसो रबाडाने मोठा विक्रम रचला, डेल स्टेन-वकार युनूस सर्वांना मागे टाकलं, पाहा
BAN vs SA Test : कागिसो रबाडाने मोठा विक्रम रचला, डेल स्टेन-वकार युनूस सर्वांना मागे टाकलं, पाहा (AFP)

Bangladesh vs South africa Test Dhaka : बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली आहे. मालिकेतील पहिला सामना आजपासून (२० ऑक्टोबर) सुरू झाला. या सामन्यात बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजीला आला, मात्र संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली. या दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज गोलंदाजांपैकी एक असलेल्या कागिसो रबाडा याने नवा विक्रम केला आहे. रबाडाने सर्वात कमी चेंडू टाकून ३०० विकेट्स घेतल्या.

विशेषत: कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर त्याने जगभरातील गोलंदाजांना मागे टाकले आहे. कागिसो रबाडाने कसोटीत सर्वात जलद ३०० विकेट्स घेतल्या आहेत.

कागिसो रबाडाने ३०० कसोटी बळी पूर्ण केले

कागिसो रबाडाने आज त्याची ३०० वी कसोटी विकेट घेतली, तोपर्यंत त्याने ११,८१७ चेंडू टाकले होते. इतक्या कमी चेंडूंमध्ये कोणीही अशी कामगिरी केली नव्हती. आतापर्यंत हा विक्रम पाकिस्तानच्या वकार युनूसच्या नावावर होता. त्याने १२,६०२ चेंडूत ही कामगिरी केली होती. 

मात्र आता तो मागे पडला आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानचा वकार दुसऱ्या क्रमांकावर आला असला तरी या यादीत दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. या यादीत डेल स्टेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १२,६०५ चेंडूत ३०० बळी पूर्ण केले. यानंतर आफ्रिकेच्याच ॲलन डोनाल्डने १३,६७२ चेंडूत ३०० विकेट्स घेतल्या होत्या.

कागिसो रबाडाचा स्ट्राईक रेटही सर्वोत्तम 

इतकेच नाही तर कागिसो रबाडा ३०० बळी घेऊनही सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला गोलंदाज आहे. जर आपण ३०० बळी घेतलेल्या गोलंदाजांबद्दल बोललो तर कागिसो रबाडाचा स्ट्राइक रेट ३९.३ आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर डॅन स्टेन असून त्याची सरासरी ४२.३ आहे. म्हणजेच या दृष्टीकोनातून पाहिले तर कागिसो रबाडाची कामगिरी आणखी सरस ठरते.

सर्वात कमी चेंडूत ३०० कसोटी बळी घेणारे गोलंदाज

कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका): ११८१७ चेंडू

वकार युनूस (पाकिस्तान) : १२६०२ चेंडू

डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) : १२६०५ चेंडू

ॲलन डोनाल्ड (दक्षिण आफ्रिका) : १३६७२ चेंडू

बांगलादेशची खराब फलंदाजी

दरम्यान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना ढाका येथे खेळला जात आहे. या सामन्यात  बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आफ्रिकेच्या वायान मुल्डरने बांगलादेशला सुरुवातीचा धक्का दिला. सामना सुरू होताच त्याने बॅक टू बॅक ३ विकेट घेत बांगलादेशला बॅकफूटवर आणले. यानंतर रबाडाने आपली जादू दाखवली. रबाडाने प्रथम रहीमला बाद केले आणि नंतर लिटन दासलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बांगलादेश संघ घरच्या मैदानावर अडचणीत सापडला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या