दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू जेपी ड्युमिनी याचा घटस्फोट झाला आहे. ड्युमिनीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. ड्युमिनी आणि त्याची पत्नी स्यू यांच्यातील संबंध बरेच दिवस चांगले चालले नव्हते. जवळपास १४ वर्षांच्या लग्नानंतर ड्युमिनी आणि स्यू आता वेगळे झाले आहेत.
ड्युमिनीची क्रिकेट कारकीर्द चमकदार राहिली आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक संघांसाठी खेळला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ड्युमिनीने सोमवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आश्चर्यकारक बातमी दिली. ड्युमिनीने सांगितले, की त्याचा घटस्फोट झाला आहे. “बऱ्याच विचारानंतर मी आणि स्यूने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतरच्या अनेक सुंदर आठवणी एकत्र केल्या हे आम्हा दोघांचे भाग्य आहे. आम्हाला दोन सुंदर मुलीही मिळाल्या आहेत."
क्रिकेट जगतातील अनेक महान खेळाडूंचा घटस्फोट झाला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला. त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक आता वेगळी राहते. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची बातमीही आली होती. मात्र, या दोघांनीही अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि शिखर धवन यांचाही घटस्फोट झाला आहे.
जेपी ड्युमिनीची क्रिकेट कारकीर्द चमकदार राहिली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी १९९ वनडे सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने ५११७ धावा केल्या आहेत. ड्युमिनीने या फॉरमॅटमध्ये ४ शतके आणि २७ अर्धशतके केली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने ६९ विकेट्सही घेतल्या आहेत. ड्युमिनी आयपीएलमध्ये अनेक संघांसाठी खेळला आहे. या स्पर्धेतील ८३ सामन्यांत त्याने २०२९ धावा केल्या आहेत. या कालावधीत २३ विकेट्स घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या