Jos Buttler on Concussion Substitute Controversy : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-20 सामना (३१ जानेवारी) पुण्यात खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा १५ धावांनी पराभव केला आणि मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली.
दरम्यान, या सामन्यात एक वादग्रस्त निर्णय घेण्यात आला. यावरून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने याबाबत संताप व्यक्त केला आहे.
वास्तविक, हर्षित राणा याला कन्कशन सब्स्टीट्युत म्हणून संघात घेतले गेले. यावरून हा वाद सुरू आहे. सामन्यात शिवम दुबेने फलंदाजी केली, त्यानंतर दुबेच्या जागी हर्षित राणाने गोलंदाजी केली आणि दमदार कामगिरी केली.
यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टीम इंडियाच्या या निर्णयावर निशाणा साधला आहे. याशिवाय दिग्गज क्रिकेटपटू केविन पीटरसन आणि मायकेल वॉन यांनीही या कनकशन पर्यायाच्या वादावर संताप व्यक्त केला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी-20 सामन्यात फलंदाजी करताना शिवम दुबे याच्या हेल्मेटवर चेंडू आदळला होता. त्यामुळे चालू सामन्यात त्याच्या जागी हर्षित राणाला बदली खेळाडू स्थान देण्यात आले.
विशेष म्हणजे, दुबे हा अष्टपैलू खेळाडू आहे तर हर्षित गोलंदाज आहे, यावरून हा वाद निर्माण झाला. हर्षितने ३ विकेट घेत सामन्याचे चित्र फिरवले.
इंग्लंडचा दिग्गज खेळाडू केविन पीटरसनने सामन्यादरम्यान समालोचन करताना सांगितले की, "हे आवडण्यासारखे नाही. आऊट होण्यापूर्वी जोस बटलर या पर्यायावर खूश नव्हता. आऊट झाल्यानंतर तो खूप संतापलेला दिसत होता." थेट डगआउटमध्ये गेला. तो प्रशिक्षकाशी बोलला कारण त्याला बदली खेळाडू नियमानुसार वाटला नाही."
आयसीसीच्या नियमांनुसार, कोणतीही दुखापत झाल्यास सामनाधिकारी फक्त ‘लाइक फॉर लाईक’ खेळाडूंची जागा घेऊ शकतात. याचा अर्थ असा आहे की गोलंदाजाच्या जागी एक गोलंदाज येऊ शकतो, तर फक्त एक फलंदाजच फलंदाजाची जागा घेऊ शकतो.
चौथ्या टी 20 मध्ये वाद झाला कारण अष्टपैलू शिवम दुबेच्या जागी गोलंदाज हर्षित राणाला आणण्यात आले.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “ही लाइक फॉर लाईक बदली नव्हती. आम्ही याच्याशी अजिबात सहमत नाही. एकतर शिवम दुबेने त्याच्या चेंडूंचा वेग ताशी २५ मैलांनी वाढवला आहे किंवा हर्षित राणा खूप चांगली फलंदाजी करायला शिकला आहे. बरं, हा सर्व खेळाचा भाग आहे आणि आम्ही सामना जिंकण्याचा विचार करायला हवा होता, परंतु आम्ही या निर्णयावर अजिबात समाधानी नाही.”
संबंधित बातम्या