भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी बेंगळुरू येथे खेळवली जात आहे. या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला, मात्र दुसऱ्या दिवशी किवी गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली.
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टीम इंडियाला अवघ्या ४६ धावांत गारद केले. ही भारताची मायदेशातील कसोटी सामन्यातील सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे.
न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. याशिवाय विल्यम ओरुरके याला ४ विकेट मिळाले. तर टीम साऊदीने १ विकेट घेतली.
टीम इंडियाच्या या लाजिरवाण्या कामगिरीनंतर आता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचे जवळपास १० वर्षे जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जोफ्रा आर्चरने सुमारे १० वर्षांपूर्वीच भारताच्या या लाजिरवाण्या कामगिरीची भविष्यवाणी केली होती.
जोफ्रा आर्चरने २१ नोव्हेंबर २०१४ रोजी ट्विट केले होते. या वेगवान गोलंदाजाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मायदेशात भारताची किमान कसोटी धावसंख्या फक्त ४६ धावा असेल. आज तब्बल १० वर्षांनंतर जोफ्रा आर्चरचे म्हणणे खरे ठरले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघ अवघ्या ४६ धावांत गारद झाला.
आता जोफ्रा आर्चरचे जुने ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी बेंगळुरू येथे खेळली जात आहे. या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला, मात्र दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी किवी गोलंदाजांपुढे शरणागती पत्करली. भारताचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला
न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सामन्यात सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. तर भारताककडून ऋषभ पंतने सर्वाधिक २० धावा केल्या. दरम्यान, आता न्यूझीलंडचा पहिला डाव सुरु असून त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत टीम इंडिया कशी कामगिरी करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या