मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Jofra Archer : जोफ्रा आर्चर कर्नाटकाकडून खेळला, तुफानी वेगापुढे इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण

Jofra Archer : जोफ्रा आर्चर कर्नाटकाकडून खेळला, तुफानी वेगापुढे इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 15, 2024 06:34 PM IST

Jofra Archer Played For Karnataka : जोफ्रा आर्चर सध्या त्याच्या काउंटी टीम ससेक्ससह बेंगळुरूला पोहोचला आहे. ससेक्ससह, लँकेशायर क्रिकेट क्लब देखील काउंटी हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षण कॅपमध्ये भाग घेण्यासाठी बेंगळुरू येथे दाखल झाला आहे

Jofra Archer Played For Karnataka : जोफ्रा आर्चर कर्नाटकाकडून खेळला, तुफानी वेगापुढे इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण
Jofra Archer Played For Karnataka : जोफ्रा आर्चर कर्नाटकाकडून खेळला, तुफानी वेगापुढे इंग्लंडच्या फलंदाजांची दाणादाण

तुम्ही एखाद्या गोलंदाजाला सामन्यात त्याच्याच संघाविरुद्ध गोलंदाजी करताना कधी पाहिले आहे का? कदाचित हा प्रश्न तुम्हाला थोडा विचित्र वाटेल, पण इंग्लंडचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर असेच काहीसे करताना दिसत आहे. जोफ्रा आर्चर सध्या बंगळुरूत असून त्याने कर्नाटकाकडून गोलंदाजी केली आहे.

वास्तविक, जोफ्रा आर्चर सध्या त्याच्या काउंटी टीम ससेक्ससह बेंगळुरूला पोहोचला आहे. ससेक्ससह, लँकेशायर क्रिकेट क्लब देखील काउंटी हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षण कॅपमध्ये भाग घेण्यासाठी बेंगळुरू येथे दाखल झाला आहे.

हे क्लब ट्रेनिंगनंतर इंग्लंडला जातील पण इंग्लंडला परतण्यापूर्वी दोन्ही संघ बंगळुरूमध्ये काही सराव सामने खेळतील. सध्या कर्नाटक आणि ससेक्स यांच्यात सामना खेळला जात आहे. पण आर्चरला ससेक्सकडून खेळताना पहिल्या दिवशी गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.

यानंतर दुसऱ्या दिवशी आर्चर कर्नाटकचा पर्यायी खेळाडू म्हणून मैदानात उतरला आणि गोलंदाजी केली. आर्चरने आपल्या गतीने कहर करत ससेक्सच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जोफ्रा आर्चर कर्नाटकासाठी गोलंदाजी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्चर बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर

जोफ्रा आर्चर अनेक दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. आर्चर IPL २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला होता. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानावर दिसला नाही. आर्चर सध्या दुखापतीतून सावरत आहे आणि वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषक २०२४ साठी तो फिट होईल, असे बोलले जात आहे.

आर्चरचे आयपीएल करिअर

२०२३ च्या आयपीएलमध्ये आर्चर केवळ पाचच सामने खेळू शकला. यामध्ये त्याला केवळ २ विकेट्स मिळाल्या. आयपीएल २०२३ दरम्यान तो उपचारासाठी बेल्जियमला ​​गेला होता.

आर्चर २०१८ मध्ये आयपीएलचा भाग बनला. पहिल्या तीन हंगामात तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला. येथे त्याने ३५ सामने खेळले आणि ४६ विकेट घेतल्या. तो आयपीएल २०२१ चा भाग नव्हता. पण आयपीएल २०२२ च्या लिलावात मुंबईने त्याच्यावर ८ कोटी रुपये खर्च केले होते. पण २०२२ च्या मोसमात तो खेळू शकला नाही.

जोफ्रा आर्चरचे आंतरराष्ट्रीय करिअर

२८ वर्षीय जोफ्रा आर्चरची गणना जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. पण अलीकडच्या दुखापतींनी या त्याच्या कारकिर्दीला ब्रेक लावला आहे. २०२१ पासून तो सतत दुखापतीशी झुंज देत आहे. तो २०२१ पासून सातत्याने खेळू शकला नाही. आतापर्यंत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३ कसोटी, २१ एकदिवसीय आणि १३ टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकूण १०२ विकेट्स घेतल्या आहेत.

IPL_Entry_Point