खेळाडूंसोबतच चाहतेही आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल २०२५ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यासाठी ५७४ खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली. पण त्यामध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे नाव नव्हते, त्यामागे इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) कडून एनओसी न देणे हे कारण सांगितले जात होते.
आता बातमी आली आहे की ईसीबीने त्याला एनओसी देऊन त्याच्या आयपीएलमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
ईसीबीने आर्चरला ग्रीन सिग्नल दिला
जोफ्रा आर्चरची नाराजी आणि ईसीबीशी झालेल्या चर्चेनंतर अखेर त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे. या संदर्भात, क्रिकेट प्रसारक मॅट कबीर फ्लॉइड यांनी "इट्स नॉट जस्ट क्रिकेट" या पॉडकास्टवर सांगितले, की "जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड या दोघांची नावे सुरुवातीच्या यादीत होती, परंतु ईसीबीने एनओसी दिलेली नाही. बीसीसीआय, ईसीबी आणि खेळाडूंचे एजंट यांच्यातील चर्चेनंतर हे प्रकरण सोडवण्यात आले आहे.
जोफ्रा आर्चर आयपीएल २०१८ ते २०२१ पर्यंत राजस्थान रॉयल्स संघात होता. या संघासाठी त्याने चमकदार कामगिरी केली. यावेळीही राजस्थान पुन्हा आर्चरवर बोली लावण्याची शक्यता आहे.
जोफ्रा आर्चर हा अनुभवी गोलंदाज असून चेन्नई सुपर किंग्ज अनुभवी खेळाडूंवर अधिक लक्ष देते. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज जोफ्रा आर्चरला आपल्या कॅम्पमध्ये आणण्याची शक्यता आहे.
पंजाब किंग्सने आयपीएल २०२५ साठी फक्त दोन खेळाडूंना रिटेन केले आहे. यावेळी पंजाब किंग्स आपला संघ नव्याने बांधण्यात सहभागी होणार आहे. अशा स्थितीत पंजाब किंग्ज जोफ्रा आर्चरवर मोठी बोली लावू शकते.