Joe Root : जो रूट सचिन तेंडुलकरचा विक्रम खरंच मोडू शकतो का? आता फक्त एवढ्या धावांची गरज, पाहा-joe root vs sachin tendulkar stats sachin and joe root runs and century difference in test cricket ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Joe Root : जो रूट सचिन तेंडुलकरचा विक्रम खरंच मोडू शकतो का? आता फक्त एवढ्या धावांची गरज, पाहा

Joe Root : जो रूट सचिन तेंडुलकरचा विक्रम खरंच मोडू शकतो का? आता फक्त एवढ्या धावांची गरज, पाहा

Aug 31, 2024 11:00 PM IST

joe root vs sachin tendulkar stats : जो रूटने इतिहास रचला आहे. तो इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. रूटने ॲलिस्टर कुकचा विक्रम मोडला आहे.

joe root vs sachin tendulkar stats : जो रूट सचिन तेंडुलकरचा विक्रम खरंच मोडू शकतो का? आता फक्त एवढ्या धावांची गरज, पाहा
joe root vs sachin tendulkar stats : जो रूट सचिन तेंडुलकरचा विक्रम खरंच मोडू शकतो का? आता फक्त एवढ्या धावांची गरज, पाहा

महान फलंदाज जो रूट याने श्रीलंकेविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकावून इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम रचला आहे. जो रूट आता इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३४ शतके करणारा फलंदाज बनला आहे.

यापूर्वी हा विक्रम ॲलिस्टर कुकच्या नावावर होता. रूटने लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात १४३ धावा आणि दुसऱ्या डावात १०३ धावा केल्या. अशाप्रकारे त्याने ॲलिस्टर कुकचा ३३ शतकांचा विक्रम मोडीत काढला.

कसोटी नंबर-वन फलंदाज रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये ३४ किंवा त्याहून अधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्त सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

या यादीत सचिन तेंडुलकर (५१ कसोटी शतके) पहिल्या स्थानावर आहे. सचिनचा हा विक्रम मोडणे रूटला खूप कठीण जाईल कारण त्याला ५२ कसोटी शतकांचा आकडा गाठण्यासाठी १७ शतके झळकावण्याची मोठी कामगिरी करावी लागेल. मात्र, सध्या रुटचा उत्कृष्ट फॉर्म पाहता त्याला टॉप-३ मध्ये पोहोचणे अवघड वाटत नाही.

सचिनच्या रेकॉर्ड धोक्यात

जो रूटने डिसेंबर २०१२ मध्ये नागपूर येथे भारताविरुद्ध इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले. त्याच्या पदार्पणापासून २०२१ पर्यंत, रूट ११७ डावांमध्ये केवळ १७ शतके झळकावू शकला होता. परंतु २०२१ ते २०२४ या ४ वर्षांपेक्षाही कमी कालावधीत त्याने केवळ ८८ डाव खेळताना १७ शतके झळकावली आहेत. रुटचा हा धोकादायक फॉर्म पाहून सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम धोक्यात आला आहे.

जो रूट सचिनपासून किती धावा दूर?

वास्तविक, सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामन्यांच्या ३२९ डावांमध्ये ५१ शतके आणि ६८ अर्धशतकांच्या मदतीने १५९२१ धावा केल्या. त्याचवेळी, ३३ वर्षीय रूटने १४५ कसोटी सामन्यांच्या २६५ डावांमध्ये ३४ शतके आणि ६४ अर्धशतकांच्या मदतीने १२३७७ धावा केल्या आहेत. म्हणजेच सचिनचा विक्रम मोडण्यासाठी रूटला ३५४४ धावांची गरज आहे.

रुट्स ज्या वेगाने वाढत आहेत ते लक्षात घेता सचिनचा विक्रम मोडता येईल, पण त्यासाठी इंग्लिश फलंदाजाला पुढील ३ वर्षे याच वेगाने धावा कराव्या लागतील.

मात्र, फलंदाजाचा फॉर्म कधी बिघडेल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत रूट सचिनचा विक्रम मोडू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जर तो सचिनच्या धावांच्या जवळही येऊ शकला तर ती एक मोठी उपलब्धी असेल.

कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर: १५९२१ धावा

रिकी पाँटिंग : १३३७८ धावा

जॅक कॅलिस: १३२८९ धावा

राहुल द्रविड: १३२८८ धावा

ॲलिस्टर कुक : १२४७२ धावा

कुमार संगकारा: १२४०० धावा

जो रूट: १२३७७ धावा