Joe Root Stats : ४ वर्षांत १६ शतकं! जो रूट आता थांबत नसतो, सचिनचे हे दोन महाविक्रम मोडणार?-joe root scored test century vs sri lanka will joe root surpass sachin tendulkar in these 2 world records of tests ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Joe Root Stats : ४ वर्षांत १६ शतकं! जो रूट आता थांबत नसतो, सचिनचे हे दोन महाविक्रम मोडणार?

Joe Root Stats : ४ वर्षांत १६ शतकं! जो रूट आता थांबत नसतो, सचिनचे हे दोन महाविक्रम मोडणार?

Aug 30, 2024 02:57 PM IST

गेल्या ४ वर्षांतील रूटचे हे १६ वे शतक आहे. यासह जो रूट आता फॅब-४ मध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे.

Joe Root Stats : ४ वर्षांत १६ शतकं! जो रूट आता थांबत नसतो, सचिनचे हे दोन महाविक्रम मोडणार?
Joe Root Stats : ४ वर्षांत १६ शतकं! जो रूट आता थांबत नसतो, सचिनचे हे दोन महाविक्रम मोडणार? (Getty)

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात गुरुवार (२९ ऑगस्ट) कसोटी सामना खेळला जात आहे. मालिकेतील या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज जो रूटने शतक झळकावले. ३३ वर्षीय जो रूटचे कसोटी क्रिकेटमधील हे ३३वे शतक आहे.

गेल्या ४ वर्षांतील रूटचे हे १६ वे शतक आहे. यासह जो रूट आता फॅब-४ मध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जो रूटने २०६ चेंडूत १४३ धावा केल्या. या डावात रुटच्या बॅटमधून १८ चौकार आले. ५० च्या आत दोन विकेट्स आणि १०० च्या आत तीन विकेट पडल्यानंतर रूट एका टोकाला उभा राहिला. त्यामुळे खराब सुरुवात होऊनही दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने ७ विकेट गमावत ३५८ धावा केल्या.

जो रूटने २०२१ पासून कमाल केली

२०२१ पर्यंत, जो रूट शतकांच्या बाबतीत फॅब-४ मध्ये चौथ्या स्थानावर होता. त्यानंतर २०२१ मध्ये रूटने ६ शतके झळकावली. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये रूटने ५ शतके झळकावली. तथापि, जो रूटसाठी २०२३ इतके चांगले नव्हते. तसे, २०२३ मध्ये इंग्लंडने जास्त कसोटी सामने खेळले नाहीत. रूटने २०२३ मध्ये २ शतके झळकावली होती. या वर्षात आतापर्यंत त्याने आपल्या बॅटने ३ शतके झळकावली आहेत.

जो रूट फॅब-४ मध्ये सर्वात पुढे

फॅब-४ बद्दल बोलायचे झाले तर आता जो रूट ३३ शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या नावावर ३२ शतके आहेत. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथनेही ३२ शतके झळकावली आहेत. भारताच्या विराट कोहलीच्या नावावर केवळ २९ शतके आहेत.

सचिनचे दोन विक्रम जो रूटच्या निशाण्यावर

जो रूटच्या रडारवर सचिन तेंडुलकरचे दोन विश्वविक्रम आहेत. पहिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे आणि दुसरा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. सचिनच्या नावावर १५९२१ धावा आणि ५१ शतके आहेत. तर रुटच्या नावावर सध्या १२२७४ धावा आणि ३३ शतके आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रूट सध्या सातव्या स्थानावर आहे. मात्र, आणखी १९९ धावा होताच तो टॉप-५मध्ये सामील होईल.

कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर: १५९२१ धावा

रिकी पाँटिंग : १३३७८ धावा

जॅक कॅलिस: १३२८९ धावा

राहुल द्रविड: १३२८८ धावा

ॲलिस्टर कुक : १२४७२ धावा

कुमार संगकारा: १२४०० धावा

जो रूट: १२२७४ धावा