मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs Eng Test : इंग्लंडच्या जो रूटची ऐतिहासिक कामगिरी; सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला!

Ind vs Eng Test : इंग्लंडच्या जो रूटची ऐतिहासिक कामगिरी; सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 25, 2024 02:04 PM IST

Joe Root breaks Sachin Tendulkar Record : भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट यानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Joe Root
Joe Root

India vs England Test : हैदराबाद इथं सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंडमधील पहिल्या कसोटीत इंग्लंडचा फलंदाज जो रूट यानं इतिहास रचला. रूटनं विश्वविख्यात फलंदाज सचिन तेंडुलकर याचा एक विक्रम मोडीत काढला आहे.

भारत-इंग्लंडमधील कसोटी सामन्यातील धावांचा हा विक्रम आहे. सचिन तेंडुलकर यानं इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या ३२ कसोटी सामन्यांमध्ये एकूण २५३५ धावा केल्या आहेत. जो रूटनं सर्वाधिक धावांचा हा आकडा आज पार केला. इंग्लंडच्या पहिल्या डावातील २१व्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून रूटनं ही ऐतिहासिक कामगिरी केली. जो रूट यानं भारताविरुद्ध खेळलेल्या २६ कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत २५४४ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप टेन खेळाडूंच्या यादीतील तीन इंग्लिश खेळाडूंपैकी तो एक आहे.

Shoaib Bashir : इंग्लंडचा 'पाकिस्तानी' खेळाडू शोएब बशीरला व्हिसा मिळाला, भारतात कधी पोहोचणार? जाणून घ्या

आणखी एक विक्रम

सचिन तेंडुलकरचा अभेद्य विक्रम मोडतानाच रुट हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) इतिहासात ४००० धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे. रूटच्या नावावर आजघडीला ४८ कसोटीत ४००५ धावा आहेत.

पुढचं लक्ष्य काय?

भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक २५५५ धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग याच्या नावावर आहे. त्यानं २९ कसोटीत या धावा काढल्या आहेत. हा विक्रम आता रूटच्या रडारवर लअसेल. रिकी पाँटिंगचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्यासाठी रूटला आता केवळ १२ धावांची गरज आहे.

भारत-इंग्लंड कसोटीत सर्वाधिक धावा करणारे दहा खेळाडू

 

खेळाडूदेशसामनेधावा
जो रूटइंग्लंड२६२५४४
सचिन तेंडुलकरभारत३२२५३५
सुनील गावसकरभारत३८२४८३
एलिस्टर कुकइंग्लंड३०२४३१
विराट कोहलीभारत२८१९९१
राहुल द्रविडभारत२११९५०
गुंडप्पा विश्वनाथभारत३०१८८०
चेतेश्वर पुजाराभारत२७१७७८
ग्रॅहम गुचइंग्लंड१९१७२५
दिलीप वेंगसरकरभारत२६१५८९

सामन्याची स्थिती काय?

भारताविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पोम्सनं चांगली सुरुवात केली. झॅक क्रॉली (२०) आणि बेन डकेट (३५) यांनी पहिल्या विकेटसाठी ११.५ षटकांत ५५ धावा जोडल्या. पण नवव्या षटकात फिरकीपटूंच्या मदतीनं भारतानं कमबॅक करत एका पाठोपाठ एक अशा तीन विकेट्स घेतल्या. क्रॉली आणि डकेटला रविचंद्रन अश्विननं डगआउटमध्ये परत पाठवलं, तर ऑली पोप (११ चेंडूत १ धाव) याला रवींद्र जडेजानं बाद केलं.

WhatsApp channel

विभाग

For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi