Joe Root : कसोटीत विक्रमांचा पाऊस पाडणारा जो रूट किती कोटींचा मालक? सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये होते गणना!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Joe Root : कसोटीत विक्रमांचा पाऊस पाडणारा जो रूट किती कोटींचा मालक? सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये होते गणना!

Joe Root : कसोटीत विक्रमांचा पाऊस पाडणारा जो रूट किती कोटींचा मालक? सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये होते गणना!

Oct 09, 2024 06:59 PM IST

Joe Root Net Worth : क्रिकेटमध्ये एकापाठोपाठ एक यश मिळवणारा जो रूट पैशाच्या बाबतीतही कोणाच्या मागे नाही. इंग्लंडच्या अनेक श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते.

Joe Root : कसोटीत विक्रमांचा पाऊस पाडणारा जो रूट किती कोटींचा मालक? सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये होते गणना!
Joe Root : कसोटीत विक्रमांचा पाऊस पाडणारा जो रूट किती कोटींचा मालक? सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये होते गणना! (AP)

सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या कसोटीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने शतक झळकावले आहे. आज (९ ऑक्टोबर) कसोटीचा तिसरा दिवस होता, जो रूट १७६ धावांवर नाबाद परतला. उद्या त्याला द्विशतक ठोकण्याची सुवर्णसंधी आहे.

दरम्यान, त्याने शतकासोबतच अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. जो रूटचे कसोटी क्रिकेटमधील हे ३५ वे शतक आहे. यासह रुट कसोटीत सर्वाधिक सहावे शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने युनूस खान, सुनील गावस्कर, ब्रायन लारा आणि महेला जयवर्धने यांना मागे टाकले आहे.

या सर्व महान खेळाडूंनी आपल्या कसोटी कारकिर्दीत प्रत्येकी ३४-३४ शतके झळकावली होती. इतकेच नाही तर रुट इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या बाबतीत त्याने ॲलिस्टर कूकला मागे टाकले आहे. 

जो रूट १० मिलियन डॉलर्सचा मालक

क्रिकेटमध्ये एकापाठोपाठ एक यश मिळवणारा जो रूट पैशाच्या बाबतीतही कोणाच्या मागे नाही. इंग्लंडच्या अनेक श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते. जो रूटची एकूण संपत्ती सुमारे १० मिलियन डॉलर्स (सुमारे ८४ कोटी रुपये) आहे.

क्रिकेट व्यतिरिक्त, तो ब्रँड एंडोर्समेंट, बोनस आणि गुंतवणुकीतूनही भरपूर कमाई करतो. जो रूटला इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून दरवर्षी १.२ मिलियन पौंड (१३ कोटी १९ लाख रुपये) मिळतात. जो रूट दीर्घकाळापासून न्यू बॅलन्स, व्हिटॅलिटी आणि ब्रूट सारख्या ब्रँडशी संबंधित आहे.

जो रूटचे क्रिकेट करिअर

जो रूटने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत १७१ वनडे सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने १६० डावांमध्ये ४७.६० च्या सरासरीने आणि ८६.७७ च्या स्ट्राईक रेटने ६५२२ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ३९ अर्धशतके आणि १६ शतके झळकावली आहेत. 

तसेच, त्याने ३२ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ३० डावांमध्ये ८९३ धावा केल्या आहेत. जो रूट १४७ कसोटी सामन्यांच्या २६८ डावांमध्ये १२५७० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

Whats_app_banner