इंग्लंडचा महान फलंदाज जो रूट आज (३० डिसेंबर) त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. रूट हा इंग्लंडच्या सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक आहे. रूटने कसोटी फॉरमॅटमध्ये तो मान मिळवला आहे जो फार कमी खेळाडूंना मिळतो.
दरम्यान जो रूट आज जो काही आहे, त्यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर याचा मोठा वाटा आहे.
खरे तर २०१३ मध्ये डेव्हिड वॉर्नर याने जो रूटला जोरदार ठोसा मारला होता. ही घटना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यानंतर एका पबमध्ये घडली. दारूच्या नशेत दोघांमध्ये भांडण झाले रुट दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमला याची खिल्ली उडवत असल्याचे वॉर्नरला वाटले. या कारणामुळे वॉर्नरने रूटला एक पंच मारला.
या घटनेचा जो रूट याच्यावर मोठा परिणाम झाला. कारण या घटनेची खूप चर्चा झाली. मीडियानेही रूटवर प्रचंड टीका केली. या घटनेनंतर जो रूटने ठरवले की, आता काहीही झाले तरी त्याचे नाव फक्त क्रिकेटमुळेच चर्चेत आले पाहिजे ना की मैदानाबाहेरील कारणांमुळे.
या घटनेनंतर म्हणजेच, २०१३ पासून जो रूटने कसोटी फॉर्मेटमध्ये ३६ शतकांसह १२ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. तसेच, ६५ अर्धशतकंही ठोकली आहेत.
एकदिवसीय सामन्यातही रूटने ६ हजारांहून अधिक धावा केल्या आणि १६ शतके झळकावली. रूटने इंग्लंडला एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून खूप यश मिळवून दिले आहे.
या घटनेनंतर अनेक वर्षांनी जेव्हा जो रूटला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो स्पष्टपणे म्हणाला, की 'मी त्यावेळी खूपच लहान होतो. पण त्या घटनेतून खूप शिकलो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला किंवा आपल्या संघाला अशा परिस्थितीत कधीही ठेवू नका. मला पुन्हा अशा बातम्यांचा भाग बनवायचे नव्हते.
जो रूटने १५२ कसोटी सामन्यांमध्ये १२९७२ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ६ द्विशतकांसह ३६ शतके आणि ६५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने १७१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६५२२ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने १६ शतके आणि ३९ अर्धशतके केली आहेत.
संबंधित बातम्या