BCCI Jobs : बीसीसीआयमध्ये नोकरीची संधी, कोण अर्ज करू शकतो? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BCCI Jobs : बीसीसीआयमध्ये नोकरीची संधी, कोण अर्ज करू शकतो? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

BCCI Jobs : बीसीसीआयमध्ये नोकरीची संधी, कोण अर्ज करू शकतो? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Updated Aug 08, 2024 08:04 PM IST

बीसीसीआयमधील जनरल मॅनेजरचे काम मार्केटिंगशी संबंधित असेल. त्याला मार्केटिंगबाबत संपूर्ण रणनीती बनवावी लागेल.

BCCI Jobs : बीसीसीआयमध्ये नोकरीची संधी, कोण अर्ज करू शकतो? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
BCCI Jobs : बीसीसीआयमध्ये नोकरीची संधी, कोण अर्ज करू शकतो? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या (PTI)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नोकरीची जाहिरात काढली आहे. मार्केटिंगसाठी बीसीसीआयला महाव्यवस्थापकाची (जनरल मॅनेजर) गरज आहे. बोर्डाने या रिक्त पदाचा तपशील त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर केला आहे. या पदावर येणाऱ्या अधिकाऱ्याचा कार्यकाळ ५ वर्षांचा असेल, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

या पदासाठी कोण-कोण अर्ज करू शकतो हेही बोर्डाने सांगितले. बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आहेत. तर जय शहा सचिव पदावर कार्यरत आहेत.

या पदासाठी कोण-कोण अर्ज करू शकतो

बीसीसीआयमधील जनरल मॅनेजरचे काम मार्केटिंगशी संबंधित असेल. त्याला मार्केटिंगबाबत संपूर्ण रणनीती बनवावी लागेल. तसेच, मार्केटिंगची मोहीमही तयार करावी लागणार आहे. त्यासाठी तो किमान पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच वय ५५ वर्षांपेक्षा कमी असावे. अर्जदाराने बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स किंवा डिप्लोमा देखील असणे आवश्यक आहे. अनुभवाबद्दल बोलायचे तर त्याच्यासाठी १५ वर्षांचा अनुभव असणेही आवश्यक आहे.

अर्ज कसा करणार?

पगाराबद्दल बोलायचे झाले तर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना खूप चांगले पगार मिळतात. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर बीसीसीआयच्या जनरल मॅनेजरला ३ ते ४ कोटी रुपये पगार मिळतो. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. बीसीसीआयच्या इतर अधिकाऱ्यांचे पगारही खूप जास्त आहेत.

जर तुम्हाला बीसीसीआयच्या महाव्यवस्थापक पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बीसीसीआयच्या अधिकृत ईमेलवर बायोडाटा पाठवावा लागेल. या पदासाठी २६ ऑगस्ट २०२४ पर्यंतच अर्ज करता येतील. त्यानंतर ही प्रक्रिया थांबवली जाईल.

टीम इंडियाने वनडे मालिका गमावली

भारतीय क्रिकेट संघ नुकताच श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. येथे टी-20 मालिकेत ३-० ने विजय मिळवला होता. पण वनडे मालिकेत २-० असा पराभव पत्करावा लागला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला होता. मात्र यानंतर श्रीलंकेने सलग दोन सामने जिंकून मालिकेवर कब्जा केला. हा विजय त्यांच्यासाठी ऐतिहासिक होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या