आता अवघ्या काही दिवसांत चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार आहे, मात्र त्याआधीच भारतीय क्रिकेट प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, डिस्ने हॉटस्टार आणि जिओ सिनेमा हे लाइव्ह स्ट्रीमिंग ॲप्लिकेशन्स आता एकत्र आले आहेत, या दोघांनी एकत्र येऊन जिओस्टार (Jiostar) हे नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे.
भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने यापुढे Jio Cinema ॲपवर मोफत उपलब्ध असणार नाहीत. जर लोकांना अँड्रॉइड डिव्हाइसवर लाइव्ह सामने पाहायचे असतील तर त्यांना सब्सक्रीप्शन घ्यावे लागणार आहे.
जेव्हा लोक सब्सक्रीप्शन प्लान खरेदी करतील तेव्हाच ते JioStar वर उपलब्ध कंटेट पाहू शकतील. जिओस्टार ऍप्लिकेशनवरील सर्वात स्वस्त प्लॅन १४९ रुपये ठेवण्यात आला आहे, ज्याचा कालावधी ३ महिन्यांचा असेल. तर तुम्ही ४९९ रुपयांमध्ये वर्षभराचे सब्सक्रीप्शन घेऊ शकता. हा प्लॅन खरेदी केल्यावर, युजर फक्त एका डिव्हाइसवर लॉग इन करण्यास सक्षम असेल.
प्रीमियम योजना सर्वात महाग आहे, ज्याचे वार्षिक सब्सक्रीप्शन १४९९ रुपयांचे आहे. प्रीमियम सबस्क्रिप्शन घेऊन, एक व्यक्ती एकाच वेळी ४ डिव्हाइसेसवर लॉग इन करू शकते आणि हा प्लॅन खरेदी करू शकते.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने फक्त जिओस्टारवर लाइव्ह स्ट्रीम केले जाणार असल्याने, तुम्हाला लाईव्ह मॅचेस लाइव्ह पाहायचे असल्यास, तुम्हाला किमान १४९ रुपयांचा सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावा लागेल.
Jio Cinema ने २०२३ मध्ये IPL च्या लाइव्ह स्ट्रीमिंगचे हक्क ३ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच २३७५८ कोटी रुपयांना विकत घेतले होते. दोन वर्षांपासून, चाहत्यांना जिओ सिनेमावर आयपीएल सामने विनामूल्य पाहता येत होते, परंतु आता डिस्नेसोबत भागीदारी केल्यानंतर, जिओने सामन्यांच्या लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी पैसे आकारण्यास सुरुवात केली आहे. हा करार ५ वर्षांसाठी करण्यात आला होता, जो २०१८ पर्यंत चालेल.
संबंधित बातम्या