भारतीय महिला क्रिकेट संघ आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची स्टार फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने शानदार शतक केले आहे केले.
जेमिमाने आपल्या शतकी खेळीत ९१ चेंडूंचा सामना करताना १०२ धावा केल्या. यादरम्यान तिने १२ चौकार मारले. जेमिमाह रॉड्रिग्जचे हे वनडे क्रिकेटमधील पहिले शतक आहे.
जेमिमाच्या या शतकी खेळीमुळे टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करत ३७० धावा केल्या.
जेमिमापूर्वी राजकोटच्या मैदानावर टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनीही या सामन्यात आपली ताकद दाखवली. विशेषतः कर्णधार स्मृती मानधना तिच्या फुल फॉर्ममध्ये दिसत होती. याशिवाय प्रतिका रावलने मालिकेतील बॅक टू बॅक दुसरे अर्धशतक झळकावले. मंधानाच्या संघाने ५४ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. या डावात मानधनाने १० चौकार आणि २ षटकार मारले तर प्रतिकाने ६७ धावांचे योगदान दिले.
भारतीय महिला संघाने आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. अशा स्थितीत भारतीय संघ दुसरी वनडे जिंकून २-० अशी अभेद्य आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.
आयर्लंडच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर ती अगदी सामान्य होती. संघाकडून आर्लेन केली आणि ओरला प्रेंडरगास्ट यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, पण या दोन्ही गोलंदाज चांगल्याच महागड्या ठरल्या. केलीने १० षटकांच्या स्पेलमध्ये ८२ धावा दिल्या तर प्रेंडरगास्टने ७५ धावा दिल्या. जॉर्जिना डेम्पसीही आयर्लंडकडून एक विकेट घेण्यात यशस्वी ठरली.
संबंधित बातम्या