Champions Trophy Song Atif Aslam : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफीचे ऑफिशियल अँन्थम सॉंग लाँच केले आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे अधिकृत गीत गायक आतिफ अस्लम याने गायले आहे. 'जीतो बाजी खेल के' असे या अँन्थम सॉंगचे शीर्षके आहे. लोकप्रिय गायक अतिफ अस्लम याने हे गीत गायले आहे.
आयसीसी पुरूष चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास आता केवळ १२ दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे या गाण्याच्या रिलीजमुळे पाकिस्तान आणि यूएईमध्ये १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत होणाऱ्या या १५ सामन्यांच्या स्पर्धेत आणखी उत्साह निर्माण होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे अँन्थम अब्दुल्ला सिद्दीकी यांनी तयार केले आहे, तर या गीताचे बोल अदनान धूल आणि असफंदयार असद यांनी लिहिले आहेत. हा म्युझिक व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे रस्ते, मार्केट आणि स्टेडियम दाखवण्यात आले आहेत. 'जीतो बाजी खेल के' हे गाणे जगभरातील लोकप्रिय स्ट्रीमिंग ऑडिओ प्लॅटफॉर्मवर चाहत्यांसाठी उपलब्ध आहे.
दोन आठवडे चालणाऱ्या या रोमांचक स्पर्धेत १९ दिवसांत जगातील अव्वल ८ संघ १५ सामन्यांमध्ये भाग घेतील. यादरम्यान २३ फेब्रुवारीला दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे अँन्थम गाणारा गायक आतिफ अस्लम म्हणाला, की'मला क्रिकेटची खूप आवड आहे आणि मला नेहमीच वेगवान गोलंदाज व्हायचे होते. मला क्रिकेट आणि लोकांच्या भावना अचूक समजतात.
मी विशेषत: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहत होतो जो नेहमीच भावनांनी भरलेला असतो. आणि म्हणूनच या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गाण्याचा भाग होण्यासाठी मी खूप उत्साहित होतो.
संबंधित बातम्या