बुमराह माझ्या स्मॅशसमोर टिकेल का? सायना नेहवाल संतापली, दिलं ओपन चॅलेंज! पाहा-jasprit bumrah wont be able to take my 300kmph smash saina nehwal ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  बुमराह माझ्या स्मॅशसमोर टिकेल का? सायना नेहवाल संतापली, दिलं ओपन चॅलेंज! पाहा

बुमराह माझ्या स्मॅशसमोर टिकेल का? सायना नेहवाल संतापली, दिलं ओपन चॅलेंज! पाहा

Aug 11, 2024 05:27 PM IST

बॅडमिंटन स्टार सायना नेहलवा हिने शुभंकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना जसप्रीत बुमराह, क्रिकेट, बॅडमिंटन आणि इतर खेळांबद्दल सविस्तर चर्चा केली.

Jasprit Bumrah Saina Nehwal : बुमराह माझ्या ३०० किमीच्या स्मॅशसमोर टिकेल का? सायना नेहवाल संतापली, दिलं ओपन चॅलेंज? पाहा
Jasprit Bumrah Saina Nehwal : बुमराह माझ्या ३०० किमीच्या स्मॅशसमोर टिकेल का? सायना नेहवाल संतापली, दिलं ओपन चॅलेंज? पाहा

भारतीय बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल सध्या चर्चेत आहे. सायना एका मुलाखतीत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याबाबत बोलताना दिसली.

सायना बुमराहच्या गोलंदाजीबद्दल बोलताना म्हणाली की, बुमराह कदाचित बॅडमिंटनमध्ये ताशी ३०० किमीच्या माझ्या स्मॅशचा सामना करू शकणार नाही.

पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक सायना नेहवाल असे का बोलली? तर या गोष्टींमागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.

वास्तविक, काही दिवसांपूर्वी सायना नेहवाल क्रिकेट आणि इतर खेळांबद्दल बोलली होती. यावेळी तिने बॅडमिंटनमधील अडचणींविषयी सांगितले. सायनाच्या याच विधानावर भाष्य करताना केकेआरचा स्टार फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कमेंट करत लिहिले, की जेव्हा जसप्रीत बुमराह १५० च्या स्पीडने बाऊन्सर टाकेल आणि तो तुमच्या डोक्याच्या जवळून जाईल तेव्हा कसे वाटेल?. पण, केकेआरचा या खेळाडूने नंतर त्याची कमेंट डिलीट केली.

आता सायना नेहलवने शुभंकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना जसप्रीत बुमराह, क्रिकेट, बॅडमिंटन आणि इतर खेळांबद्दल सविस्तर चर्चा केली.

सायना नेहलव म्हणाली, "मी जसप्रीत बुमराहचा सामना का करेन? मी ८ वर्षापासून खेळत असते तर कदाचित मी जसप्रीत बुमराहला उत्तर दिले असते."

ती पुढे म्हणाली, "जर जसप्रीत बुमराह माझ्यासोबत बॅडमिंटन खेळला असता, तर कदाचित तो माझ्या स्मॅशचा सामना करू शकला नसता. आपल्या देशात या गोष्टींवरून आपण आपसात भांडू नये.

मला आधीही हेच सांगायचे होते. प्रत्येक खेळ आपल्या जागी सर्वोत्कृष्ट आहे, परंतु मला असे म्हणायचे आहे की आपण इतर खेळांचाही आदर केला पाहिजे. बाकी क्रीडा संस्कृती आपण कुठून आणणार? क्रिकेट, बॉलीवूड हे नेहमीच आपले लक्ष फोकस असणार आहे."