मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sanjana Ganesan : अश्लील कमेंट करणाऱ्या इन्स्टा युजरला संजना गणेशनचं सणसणीत उत्तर, म्हणाली…

Sanjana Ganesan : अश्लील कमेंट करणाऱ्या इन्स्टा युजरला संजना गणेशनचं सणसणीत उत्तर, म्हणाली…

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 13, 2024 12:08 PM IST

Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनच्या पोस्टवर एका सोशल मीडिया यूजरने अश्लील कमेंट केली. यावर संजनाने चोख उत्तर दिले आहे.

Sanjana Ganesan Jasprit Bumrah
Sanjana Ganesan Jasprit Bumrah

Sanjana Ganesan Jasprit Bumrah : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची पत्नी संजना गणेशन सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टीव्ह असते. आता नुकतची संजना गणेशनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती बुमराहसोबत दिसत आहे.

पण संजनाच्या या पोस्टवर एका सोशल मीडिया यूजरने एक वाईट कमेंट केली आहे. पण यानंतर सजनाने कमेंट करणाऱ्याला चोख प्रत्युत्तर दिले. संजनाचा हा रिप्लाय आता व्हायरल होत आहे. संजनाने व्हॅलेंटाईन डे वीक निमित्ताने एक पोस्ट शेअर केली होती. यावर इतर युजर्सच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत.

संजना गणेशनची कमेंट व्हायरल

वास्तविक, संजनाने व्हॅलेंटाईन डेपूर्वी सोशल मीडियावर एक प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर एका यूजरने बॉडी शेमिंग कमेंट केली. त्याने लिहिले, “वहिनी जाड दिसत आहेत.” यावर संजनाने चोख उत्तर दिले. संजनाने लिहिले, "तुला साधं शाळेतील विज्ञानाचं पुस्तक लक्षात राहत नाही आणि महिलांच्या बॉडीवर कमेंट करतोयस, चल पळ इथून "

आता संजनाच्या या कमेंटवर शेकडो चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण बहुतेक चाहत्यांनी तिचे आणि बुमराहचे कौतुक केले आहे. व्हिडिओ पोस्टला दीड लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

संजना व्यवसायाने स्पोर्ट्स अँकर आहे. तिने २०२१ मध्ये बुमराहशी लग्न केले. संजनाने एका मुलालाही जन्म दिला आहे. त्याचे नाव अंगद बुमराह असे ठेवण्यात आले आहे. संजना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती बुमराहसोबतचे नेहमी फोटो शेअर करत असते.

Sanjana Ganesan post
Sanjana Ganesan post

जसप्रीत बुमराह सध्या टीम इंडियासोबत

जसप्रीत बुमराह सध्या टीम इंडियासोबत आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो भारतीय संघाचा भाग आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत बुमराह अव्वल आहे. त्याने २ सामन्यात १५ विकेट घेतल्या आहेत. हैदराबाद कसोटीत बुमराहने ६ विकेट घेतल्या होत्या. यानंतर विशाखापट्टणम कसोटीत ९ विकेट्स घेतल्या. बुमराहने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ६ तर दुसऱ्या डावात ३ बळी घेतले.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi