Jasprit Bumrah vs South Africa : जसप्रीत बुमराह सध्या तिन्ही फॉरमॅटचा जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. बुमराह केवळ भारतीयच नाही तर परदेशी पीचेसवरही प्रभावी ठरतो.
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातही बुमरहाने आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे. त्याने या कसोटीच्या दुसऱ्या डावात ६ आफ्रिकन फलंदाजांची शिकार केली.
बुमराहने ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन, मार्को यानसेन आणि केशव महाराज आणि लुंगी एनगिडी यांना आपले बळी बनवले. यासोबतच बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर तिसऱ्यांदा ५ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.
बुमराहने इंग्लंडमध्ये दोनदा, वेस्ट इंडिजमध्ये दोनदा आणि ऑस्ट्रेलियात एकदा एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. बुमराहचे हे आकडे पाहिल्यानंतर स्पष्ट होते की तो केवळ मायदेशातच नाही तर परदेशातही आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना त्रस्त करतो.
दरम्यान, या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात बुमराहने २ बळी घेतले होते. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत बुमराहने ४ विकेट्स घेतल्या होत्या. अशा प्रकारे बुमराहने आफ्रिकेत आपला प्रभाव कायम ठेवला आहे.
दक्षिण आफ्रिकेत तीनदा ५ विकेट्स
इंग्लंडमध्ये दोनदा ५ विकेट्स
वेस्ट इंडिजमध्ये दोनदा ५ विकेट्स
ऑस्ट्रेलियात एकदा ५ विकेट्स.
केपटाऊन कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने धुमाकूळ घातला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे आफ्रिका ५५ धावांत गारद झाली. सिराजने पहिल्या डावात एकूण ६ विकेट घेतल्या होत्या. सिराजने आफ्रिकेच्या एडन मार्कराम, डीन एल्गर, टोनी डी जॉर्जी, बेडिंगहॅम, काइल वॉरेन आणि मार्को यानसेन यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.
संबंधित बातम्या