आयपीएलचा १८वा सीझन सुरू होण्यास आता फारसा वेळ उरलेला नाही. हा हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. मात्र त्याआधी मुंबई इंडियन्ससह अनेक संघांसाठी बॅड न्यूज समोर आल्या आहेत.
वास्तविक, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सीझनच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडू शकतो. बुमराहसोबतच अनेक मोठ्या नावांचा या यादीत समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार मिचेल मार्श आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सचा भाग आहे. पण आयपीएल २०२५ हंगामाच्या सुरुवातीला मिचेल मार्श दिसणार नाही. यापूर्वी, मिचेल मार्श आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा भाग नव्हता.
त्याचवेळी, आता तो लखनौ सुपर जायंट्सकडून सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळणार नाही. मात्र, मिचेल मार्श मैदानात कधी परततो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव संघात कधी सामील होणार? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मयंक यादव मोसमातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दिसणार नसल्याचे मानले जात आहे. मात्र, मिचेल मार्शशिवाय मयंक यादवच्या दुखापतीने लखनौ सूर जायंट्सच्या शिबिरातील अडचणीत भर पडली आहे.
मात्र, मोसमातील सुरुवातीच्या सामन्यांनंतर मयंक यादव लखनऊ सुपर जायंट्सच्या जर्सीत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.
या यादीतील सर्वात मोठे नाव आहे जसप्रीत बुमराह याचे. जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपासून बाहेर आहे. अलीकडेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जसप्रीत बुमराहशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दाखल झाला होता.
वास्तविक, जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. मात्र, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की जसप्रीत बुमराह वेगाने बरा होत आहे. जसप्रीत बुमराह लवकरच मैदानात पुनरागमन करू शकतो, असे मानले जात आहे.
संबंधित बातम्या