Jasprit Bumrah vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तीन सामने खेळले गेले आहेत. टीम इंडिया सध्या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा सामना २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.
पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रांची कसोटीतून एका स्टार खेळाडूला विश्रांती देण्यात येणार आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, टीम इंडिया इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी आपला सर्वोकृष्ट गोलंदाज आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यास तयार आहे. रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह टीम इंडियासोबत राजकोटहून रांचीला जाणार नाही. बुमराह राजकोटहून थेट अहमदाबादला रवाना होणार आहे.
मात्र, यानंतर धरमशाला येथे होणाऱ्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात जसप्रीत बुमराह संघात परतणार आहे. पण तो त्या सामन्यात खेळणार की नाही हे चौथ्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल.
बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय हा भारतीय संघाच्या वर्कलोड मॅनेजमेंटचा एक भाग आहे. या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बुमराहने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये ८०.५ षटके टाकली आहेत आणि १७ बळी घेतले आहेत.
बुमराहला विश्रांती दिल्यानंतर मुकेश कुमारचे संघात पुनरागमन होऊ शकते. मुकेश कुमारला रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी तिसऱ्या कसोटीदरम्यान संघातून रिलीज करण्यात आले होते.
रणजी ट्रॉफी सामन्यात बिहारविरुद्ध बंगालकडून खेळताना मुकेश कुमारने अप्रतिम कामगिरी केली. त्याने त्या सामन्याच्या पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्ससह एकूण १० बळी घेतले.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर., कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
संबंधित बातम्या