Jasprit Bumrah Sam Konstas Wicket Celebration : ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टास मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. हा त्याचा पदार्पणाचा सामना आहे. त्याने पहिल्या डावात अर्धशतक केले, त्या खेळी दरम्यान त्याचा आणि विराट कोहलीचा वाददेखील झाला होता. त्यानंतर कॉन्स्टास आणखी चर्चेत आला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस कोण विसरू शकेल. युवा फलंदाज सॅम कॉन्स्टास याने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. विशेष म्हणजे त्याने सामन्यापूर्वीपासूनच बुमराहविरोधात वक्तव्ये करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर फलंदाजी करताना त्याने बुमराहविरुद्ध स्कूप आणि रिव्हर्स स्कूपसारखे शॉट्स खेळले. याचा परिणाम असा झाला की बुमराहने एका षटकात १४ धावा आणि दुसऱ्या षटकात १८ धावा खाल्ल्या.
पण आता दुसऱ्या डावात बुमराहने दाखवून दिले की त्याला जगातील सर्वोत्तम गोलंदाज का म्हटले जाते. पहिल्या डावात सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहसह इतर भारतीय गोलंदाजांविरुद्ध खूप धावा केल्या. पण आता म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बुमराहने त्याला त्याची जागा दाखवून दिली आहे.
जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात सॅम कॉन्स्टासला सुरुवातीपासूनच दडपणाखाली ठेवले. त्याने काही वेळा शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही. ऑस्ट्रेलियन डावाच्या ७व्या षटकात एका वेगवान इनस्विंगरला टाकला. चेंडू कॉन्स्टासच्या बॅट आणि पॅडमधून जाऊन मधल्या स्टंपवर आदळला. १९ वर्षीय कोंटासने १८ चेंडूत ८ धावा केल्या. त्यात एका चौकाराचा समावेश होता.
डावाच्या सहाव्या षटकात बुमराहने कॉन्स्टन्ससाठी सेटअप तयार केला. त्याने ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर युवा ऑस्ट्रेलियन फलंदाजाला बीट केले, तर दुसरा चेंडूही त्याने बाहेरच्या दिशेने टाकला पण तिसरा चेंडू इन-स्विंग होता, ज्यावर कॉन्स्टास बीट झाला आणि त्याचे स्टंप उडाले.
जसप्रीत बुमराह सॅम कॉन्स्टासला बोल्ड करून थांबला नाही. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणादरम्यान सॅम कॉन्स्टास प्रेक्षकांना सतत जल्लोष करण्याचे संकेत देत होता.
तसेच, भारताच्या डावात जेव्हा विराट कोहली बाद झाला होता, तेव्हा कॉन्स्टासने प्रेक्षकांच्या दिशेने हात हालवत त्यांना जोरदार जल्लोष करण्यास सांगितले होते. बुमराहने हे विसरले नाही. कॉन्स्टासला बोल्ड केल्यानंतर त्याने त्याच्याच स्टाइलमध्ये सॅम कॉन्स्टासला प्रत्युत्तर दिले आहे.
मेलबर्न कसोटीदरम्यानच, बुमराहने एका मीडिया मुलाखतीत सांगितले होते की, पहिल्या डावाच्या पहिल्या दोन षटकांमध्ये तो कॉन्स्टन्सला ६-७ वेळा बाद करण्याच्या जवळ आला होता. भारतीय गोलंदाजाने सांगितले की, त्याला आव्हाने आवडतात आणि कॉन्स्टन्ससोबतच्या लढाईबद्दल तो उत्साहित आहे.
कॉन्स्टन्सने पहिल्या डावात ६५ चेंडूत ६० धावा केल्या होत्या, या डावात त्याने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर २ षटकार ठोकले होते. जवळपास ३ वर्ष आणि ४४८३ चेंडूंनंतर बुमराहला षटकार ठोकणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला.
संबंधित बातम्या