Jasprit Bumrah Role Model : सर्वात मोठं रहस्य उलगडलं! जसप्रीत बुमराहचा गोलंदाजीतील आदर्श कोण? जाणून घ्या-jasprit bumrah reveals who inspired him to become a bowler how practiced cricket after watching television ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Jasprit Bumrah Role Model : सर्वात मोठं रहस्य उलगडलं! जसप्रीत बुमराहचा गोलंदाजीतील आदर्श कोण? जाणून घ्या

Jasprit Bumrah Role Model : सर्वात मोठं रहस्य उलगडलं! जसप्रीत बुमराहचा गोलंदाजीतील आदर्श कोण? जाणून घ्या

Aug 17, 2024 01:29 PM IST

अहमदाबादमध्ये एका वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान, बुमराहने त्याच्या आयुष्यातील अनेक न ऐकलेल्या पैलूंवर प्रकाश टाकला.

Jasprit Bumrah Role Model : सर्वात मोठं रहस्य उलगडलं! जसप्रीत बुमराहचा आदर्श कोण? जाणून घ्या
Jasprit Bumrah Role Model : सर्वात मोठं रहस्य उलगडलं! जसप्रीत बुमराहचा आदर्श कोण? जाणून घ्या (PTI)

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची गणना आज जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजांमध्ये केली जाते. पण इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता.

अलीकडेच, अहमदाबादमध्ये एका वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान, बुमराहने त्याच्या आयुष्यातील अनेक न ऐकलेल्या पैलूंवर प्रकाश टाकला.

त्याने सांगितले की त्याला त्याच्या आईकडून क्रिकेटसाठी कसे फटकारले जायचे. त्याला क्रिकेटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. या कार्यक्रमात जसप्रीत बुमराहने त्याच्या रोल मॉडेलबद्दलही सांगितले.

आईकडून क्रिकेटला विरोध

त्याच्या लहानपणी, बुमराहच्या आईला त्याने क्रिकेट खेळावे असे वाटत नव्हते, यासाठी तिने त्याला अनेकदा फटकारलेही. बुमराह म्हणाला, "मला फारसे नियमित प्रशिक्षण मिळाले नाही आणि माझ्या आईलाही मी दहावी पूर्ण होईपर्यंत क्रिकेट खेळावे असे वाटत नव्हते, कारण तिला वाटत होते की मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. त्यामुळे शिकण्याचा एकमेव मार्ग आहे. ते म्हणजे दूरदर्शनच्या माध्यमातून.

जसप्रीत बुमराहचा आदर्श कोण?

बुमराहची बालपणी स्वताची अशी बॉलिंग ॲक्शन नव्हती. तो ज्या गोलंदाजाला विकेट घेताना पाहायचा तो त्याची बॉलिंग ॲक्शन कॉपी करायचा.

तो म्हणाला की, "लहानपणी, जेव्हा जो गोलंदाज विकेट घ्यायचा, तेव्हा मी त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करायचो कारण माझ्याकडे माझी स्वतःची कोणतीही खास बॉलिंग ॲक्शन नव्हती. अशाप्रकारे, वेगवेगळ्या ॲक्शन्सची कॉपी करून मी माझी स्वतःची एक खास ॲक्शन बनवली. ."

बुमराहने असेही उघड केले की तो डाव्या हाताच्या गोलंदाजांनी खूप प्रभावित होता आणि त्याने स्वतः डाव्या हाताने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, "पण होय, मी डाव्या हाताच्या गोलंदाजांनीही खूप प्रभावित होतो आणि डाव्या हातानेही गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मी दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतो, पण वेगात फरक येतो."

त्यामुळे जसप्रीत बुमराहचे आदर्श ते सर्व गोलंदाज आहेत ज्यांना त्याने टीव्ही स्क्रीनवर पाहिले, ज्यांनी त्याच्या कल्पनेला पंख दिले आणि त्याला जगातील सर्वात धोकादायक गोलंदाज बनवले.