Jasprit Bumrah Story : जसप्रीत बुमराह टीम इंडियापर्यंत कसा पोहोचला? क्रिकेट सोडून कॅनडाला जाण्याच्या तयारीत होता-jasprit bumrah life story how jasprit bumrah enterd in ipl and then in indian cricket team know full story ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Jasprit Bumrah Story : जसप्रीत बुमराह टीम इंडियापर्यंत कसा पोहोचला? क्रिकेट सोडून कॅनडाला जाण्याच्या तयारीत होता

Jasprit Bumrah Story : जसप्रीत बुमराह टीम इंडियापर्यंत कसा पोहोचला? क्रिकेट सोडून कॅनडाला जाण्याच्या तयारीत होता

Sep 06, 2024 01:15 PM IST

Jasprit Bumrah Story : आयपीएलमध्ये पदार्पण करण्याच्या एक वर्ष आधी म्हणजेच २०१२ मध्ये जसप्रीत बुमराहने क्रिकेट सोडून कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला होता, पण नंतर अचानक त्याचे नशीब बदलले.

Jasprit Bumrah Story : जसप्रीत बुमराह टीम इंडियापर्यंत कसा पोहोचला? क्रिकेट सोडून कॅनडाला जाण्याच्या तयारीत होता
Jasprit Bumrah Story : जसप्रीत बुमराह टीम इंडियापर्यंत कसा पोहोचला? क्रिकेट सोडून कॅनडाला जाण्याच्या तयारीत होता (PTI)

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा भारतीय क्रिकेटसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. बुमराहने टीम इंडियाला २०२४ चा टी-20 वर्ल्ड जिंकून दिला. टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर झालेल्या सत्कार समारंभात विराट कोहलीने जसप्रीत बुमराहला या पिढीचा सर्वोत्तम गोलंदाज म्हटले होते.

पण तुम्हाला माहीत आहे का जसप्रीत बुमराहचा शोध कसा लागला आणि तो टीम इंडियापर्यंत कसा पोहोचला?

२०१३ हे वर्ष बुमराहसाठी खूप खास होते. या वर्षी बुमराहने आयपीएलमध्ये पदार्पण केले, त्यानंतर त्याचे नशीब बदलले. पण आयपीएलपूर्वी २०१३ सालची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी बुमराहसाठी खूप महत्त्वाची ठरली, यामुळेच त्याला पुढे जाण्यास मदत झाली.

बुमराह गुजरातकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. जर गुजरातच्या निवडकर्त्यांनी ११ वर्षांपूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी बुमराहची निवड केली नसती तर कदाचित तो आज टीम इंडियात नसता.

बुमराहने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता

२०१३ पूर्वी बुमराहच्या करिअरमध्ये फारशी प्रगती झाली नव्हती. त्यामुळे क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता. तो क्रिकेट सोडून कॅनडाला जाण्याचा विचारात होता. पण यादरम्यान बुमराह जिल्हा संघात सामील झाला. पण बुमराहला जिल्हा संघाकडून फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आणि त्यात त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली. यानंतर त्याला राज्य संघात स्थान मिळाले.

बुमराहसाठी २०१३ हे वर्ष खूपच खास होते

बुमराहने २०१३ मध्ये लिस्ट ए, फर्स्ट क्लास आणि टी-20 पदार्पण केले. २०१३ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये, बुमराहने जॉन राइटचे लक्ष वेधून घेतले जे मुंबई इंडियन्ससाठी तरुण प्रतिभा शोधत होते.

यानंतर बुमराहने २०१३ मध्येच आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर, बुमराहने बीसीसीआयचे लक्ष वेधून घेतले आणि २०१६ मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले.

बुमराहने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. तो वनडे सामना होता. त्यानंतर २ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बुमराहने २०१८ मध्ये कसोटी क्रिकेट क्रिकेटमध्ये प्रवेश केला. आता बुमराह टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज बनला आहे.