Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने डागले 'अमोघ' मिसाइल, ऑली पोपचे तिन्ही स्टंप उखडून पडले, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने डागले 'अमोघ' मिसाइल, ऑली पोपचे तिन्ही स्टंप उखडून पडले, पाहा

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने डागले 'अमोघ' मिसाइल, ऑली पोपचे तिन्ही स्टंप उखडून पडले, पाहा

Feb 03, 2024 03:47 PM IST

Jasprit Bumrah Clean Bowled Ollie Pope : बुमराहने २८व्या षटकात एका आउटस्विंगरवर रूटची विकेट काढली. यानंतर बुमराहने ऑली पोपचे स्टंप धारदार यॉर्करने उडवले.

Jasprit Bumrah Yorker Ollie Pope
Jasprit Bumrah Yorker Ollie Pope (icc)

India vs England 2nd Test Day 2, Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून (२ फेब्रुवारी) विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. आज (३ फेब्रुवारी) सामन्याचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर आटोपला.

यानंतर आता इंग्लंडचा पहिला डाव खेळला जात आहे. या दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दुसऱ्या सत्रात शानदार गोलंदाजी केली. लंचनंतर बुमराहने जो रूट आणि ऑली पोप या दोन सर्वात महत्वाच्या फलंदाजांची शिकार केली आणि इंग्लंडला अडचणीत आणले.

बुमराहने २८व्या षटकात एका आउटस्विंगरवर रूटची विकेट काढली. यानंतर बुमराहने ऑली पोपचे स्टंप धारदार यॉर्करने उडवले.

१० डावात पाचव्यांदा ऑली पोपची शिकार

बुमराहने पोपला बाद करण्याची १० डावातील ही पाचवी वेळ होती. पोपची विकेट खूप महत्त्वाची होती कारण त्याने हैदराबाद कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात १९६ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती. त्याच्या खेळीमुळेच इंग्लंडने पलटवार करत सामना जिंकला होता.

या सामन्यातही पोप तेच करण्याच्या प्रयत्न होता. त्याने ५४ चेंडूत २३ धावा केल्या होत्या आणि मोठी इनिंग खेळण्याच्या मुडमध्ये होता. पण बुमराहचा धारदार यॉर्कर स्टंपवर आदळला आणि ओली पोपचा डाव संपला.

बुमरहाचा यॉर्कर एखाद्या मिसाइलप्रमाणे स्टंपवर येऊन आदळला. पोपला काही समजायच्या आतच त्याचे तिन्ही स्टंप उखडून पडलेले होते.

तत्पूर्वी, या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावात सर्वबाद ३९६ धावा केल्या. भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक २०९ धावा केल्या. तर इंग्लंडासठी जेम्स अँडरसनने २५ धावात ३ विकेट घेतल्या.

इंग्लंडची चांगली सुरुवात पण नंतर गळती लागली

भारताच्या ३९६ धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडनेही चांगली सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी पन्नास धावा जोडल्यानंतर लागोपाठ विकेट गमावल्या. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जॅक क्रॉलीने त्याची विकेट फेकली. क्रॉलीच्या विकेटमुळे इंग्लंडसाठी अडचणी निर्माण झाल्या आणि त्यांनी रूट आणि पोपच्या रूपाने लागोपाठ दोन विकेट गमावल्या.

हे वृत्त लिहिपर्यंत बेन स्टोक्स आणि बेन हार्टली फलंदाजी करत होते. इंग्लंडच्या ७ बाद २०५ धावा झाल्या होत्या.े

Whats_app_banner