Jasprit Bumrah jumps to Top on ICC Test rankings: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताच स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी केली. या कामगिरीच्या जोरावर बुमराहने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे.
विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर १०६ धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयात जसप्रीत बुमराहचा सिंहाचा वाटा आहे. त्याने ९१ धावांत ९ विकेट घेतले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
दुसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी बुमराह चौथ्या स्थानावर होता आणि त्याने तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी मार्चपासून पहिल्या क्रमांकावर असलेला रविंद्र अश्विनची क्रमवारीत दोन स्थानांनी घसरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा न्यूझीलंडमधील दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेतून बाहेर असूनही दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने इंग्लंडच्या पहिल्या डावात ४५ धावांत ६ आणि दुसऱ्या डावात ४६ धावांत ३ विकेट घेतले. विशाखापट्टणम येथील खेळपट्टी फीरकी गोलंदासाठी अनुकूल आहे. मात्र, तरीही जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी केली.
दरम्यान, २०१८ मध्ये पदार्पण केल्यापासून आतापर्यंत बहुतेक वेळा त्याला विश्रांती देण्यात आली किंवा दुखापत झाली. तरीही त्याने घरच्या मैदानावर खेळलेल्या कसोटीत १३.०६ च्या सरासरीने तब्बल २९ विकेट घेतले आहेत. बुमराहने ३४ सामन्यात २०.१९ च्या सरासरीने १५५ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, अश्विनने दुसऱ्या डावात तीन विकेट घेतल्या, पण पहिल्या डावात एकही विकेट घेतली नाही, ज्यामुळे तो चौथ्या क्रमांकावर घसरला. त्याच्या नावावर ४९९ कसोटी विकेट्स आहेत आणि अनिल कुंबळेनंतर ५०० विकेट घेणारा तो दुसरा भारतीय होण्यापासून एक दूर आहे.