Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार? आज टीम इंडियाची निवड होणार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार? आज टीम इंडियाची निवड होणार

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार? आज टीम इंडियाची निवड होणार

Jan 18, 2025 09:53 AM IST

Jasprit Bumrah Injury News : जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघाचा भाग असेल की नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज (१८ जानेवारी) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे.

जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार? अशी आहे फिटनेस, आज टीम इंडियाची निवड होणार
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार? अशी आहे फिटनेस, आज टीम इंडियाची निवड होणार (REUTERS)

Team India Squad For Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा आज म्हणजेच (१८ जानेवारी) होणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर पत्रकार परिषदेत भारतीय संघाची घोषणा करतील. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात जसप्रीत बुमराह याची निवड होणार की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 

अशा अनेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर एक नवीन अपडेट समोर आले आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी संघात बुमराहचा समावेश जवळपास निश्चित झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. पण स्कॅनिंगनंतर त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसून त्याच्या कमरेला फक्त सूज असल्याचे आढळून आले. 

बुमराहच्या फिटनेसबाबत ताजी माहिती अशी आहे की, त्याला जास्त व्यायाम करण्यास मनाई करण्यात आली आहे आणि बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिजिओथेरपिस्ट त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहित शर्मा यांना बुमराहबाबत अत्यंत सावधपणे निर्णय घ्यावा लागणार आहे.

जसप्रीत बुमराहला किमान ५ आठवडे विश्रांतीची गरज आहे. वैद्यकीय तज्ज्ञांकडून मिळालेला हा सल्ला बीसीसीआयने स्वीकारला आहे. ५ आठवड्यांच्या विश्रांतीनंतर त्याची पुन्हा एकदा फिटनेस टेस्ट घ्यावी लागेल, त्यानंतरच तो मैदानात परतू शकेल. 

बुमराहला फिट घोषित आहे, पण, १२ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडेमध्ये त्याची फिटनेस टेस्ट होऊ शकते. पण चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम संघ घोषित करण्याची अंतिम तारीख ११ फेब्रुवारी आहे. सध्या अपडेट असे आहे की, बुमराहचे नाव चॅम्पियन्स ट्रॉफी संघात समाविष्ट होणार आहे. पण तो सामना खेळणार की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या