Jasprit Bumrah Fitness Update : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. परंतु या संघात अजूनही बदल करणे शक्य आहे. वास्तविक, आयसीसीने सर्व ८ संघांना ११ फेब्रुवारीपर्यंत आपापल्या संघात बदल करण्याची मुदत दिली आहे.
टीम इंडियाचा सर्वात महत्वाचा खेळाडू आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा फिटनेस टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. आता एका मीडिया रिपोर्टमधून समोर आले आहे की बुमराह बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पोहोचला आहे, जिथे तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असेल.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार जसप्रीत बुमराह २-३ दिवस NCA तज्ञांच्या निरिक्षणाखाली राहणार आहे. संपूर्ण तपासानंतरच अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीकडे बुमराहच्या फिटनेस रिपोर्ट पाठवला जाईल.
भारतीय संघाची घोषणा होण्यापूर्वी एक अपडेट समोर आले होते की, बुमराहचा भारतीय संघात समावेश केला जाईल, पण तो प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की नाही हे केवळ त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे.
गेल्या महिन्यात, पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सांगितले होते, की जसप्रीत बुमराहला ५ आठवड्यांची विश्रांती देण्यात आली आहे आणि तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार नाही. बुमराहच्या फिटनेसबाबत फेब्रुवारीच्या सुरुवातीला निर्णय घेतला जाईल. सर्व वैद्यकीय तपासणी अहवाल तपासूनच कोणताही निर्णय घेतला जाईल'.
जसप्रीत बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात कायम ठेवायचे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी भारतीय संघाला फक्त एक आठवडा उरला आहे. ११ फेब्रुवारीपर्यंत सर्व ८ संघांनी कोणत्या खेळाडूंना संघात ठेवायचे आणि कोणाला नाही हे ठरवायचे आहे. दरम्यान, बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत खेळून फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे.
संबंधित बातम्या