Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने टेस्ट क्रिकेटचा इतिहासच बदलून टाकला, आजपर्यंत कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने टेस्ट क्रिकेटचा इतिहासच बदलून टाकला, आजपर्यंत कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने टेस्ट क्रिकेटचा इतिहासच बदलून टाकला, आजपर्यंत कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

Dec 29, 2024 08:59 AM IST

Jasprit Bumrah 200 Test WICKETS : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये २०० वी विकेट घेत इतिहास रचला आहे. १४८ वर्षांच्या कसोटी इतिहासात आजपर्यंत कोणत्याही गोलंदाजाला २० पेक्षा कमी सरासरीने अशी कामगिरी करता आली नव्हती.

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने टेस्ट क्रिकेटचा इतिहासच बदलून टाकला, आजपर्यंत कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने टेस्ट क्रिकेटचा इतिहासच बदलून टाकला, आजपर्यंत कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं (AP)

भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचे द्विशतक पूर्ण केले. जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा अव्वल फॉर्म फलंदाज ट्रॅव्हिस हेडला बाद करून ही खास कामगिरी केली.

कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाला जे जमले नाही ते बुमराहने करून दाखवले आहे. कसोटीत २० पेक्षा कमी सरासरीने २०० बळी घेणारा बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज आहे.

जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा भारतासाठी तेच केले आहे, ज्याची प्रत्येक भारतीय चाहत्याकडून अपेक्षा असते. बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशी सॅम कॉन्स्टासच्या रूपात भारताची पहिली विकेट मिळवणाऱ्या या गोलंदाजाने फॉर्मात असलेल्या ट्रॅव्हिस हेडला बाद करून विश्वविक्रम रचला. 

हेडला पहिल्या डावातही बुमराहनेच शुन्यावर बाद केले होते आणि आता दुसऱ्या डावातही त्याने असाच चमत्कार केला. नितीश रेड्डीने त्याचा झेल घेतला.

कसोटीत अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दुसरी विकेट घेत या फॉरमॅटमधील विकेट्सचे द्विशतक पूर्ण केले. २०० किंवा त्याहून अधिक बळी घेतलेल्या जगातील कोणत्याही गोलंदाजाने २० पेक्षा कमी सरासरीने विकेट घेतलेल्या नाहीत.

जसप्रीत बुमराह हा जगातील पहिला असा गोलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिजच्या माल्कम मार्शलने ३७६ विकेट घेतल्या असून त्याची सरासरी २०.९४ आहे.

बुमराहने २०१८ मध्ये भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जसप्रीत बुमराह कसोटीत सर्वात कमी चेंडूत २०० बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील ८४८४ व्या चेंडूवर हेडला बाद केले. जगातील सर्वात कमी चेंडूंवर २०० बळी घेण्याचा विक्रम पाकिस्तानच्या वकार युनूसच्या नावावर आहे.

१९८९ मध्ये डेब्यू करणाऱ्या वकारने ७७२५ चेंडूत २०० विकेट्स पूर्ण केल्या होत्या. या यादीत बुमराह जगातील चौथ्या क्रमांकावर आहे.

कसोटीत सर्वात कमी चेंडूंवर २०० बळी

७७२५ - वकार युनूस

७८४८ - डेल स्टेन

८१५३ - कागिसो रबाडा

८४८४ - जसप्रीत बुमराह

सर्वात कमी धावा देत २०० बळी

जसप्रीत बुमराहने कसोटीत २० पेक्षा कमी सरासरीने २०० बळी पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत कसोटीत ४००० धावा देण्यापूर्वी कोणत्याही गोलंदाजाला २०० बळी घेता आलेले नाहीत मात्र बुमराहने तसे केले आहे. त्याने ३९१२ धावा देत २०० बळी पूर्ण केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या