Jasprit Bumrah BCCI Award : जसप्रीत बुमराहनं जिंकला पॉली उमरीगर पुरस्कार, बक्षीस रक्कम किती मिळाली? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Jasprit Bumrah BCCI Award : जसप्रीत बुमराहनं जिंकला पॉली उमरीगर पुरस्कार, बक्षीस रक्कम किती मिळाली? जाणून घ्या

Jasprit Bumrah BCCI Award : जसप्रीत बुमराहनं जिंकला पॉली उमरीगर पुरस्कार, बक्षीस रक्कम किती मिळाली? जाणून घ्या

Feb 01, 2025 11:06 PM IST

BCCI Naman Award 2025 : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची बीसीसीआयने सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. त्यांना पॉली उमरीगर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Jasprit Bumrah BCCI Award : जसप्रीत बुमराहनं जिंकला पॉली उमरीगर पुरस्कार, बक्षीस रक्कम किती मिळाली? जाणून घ्या
Jasprit Bumrah BCCI Award : जसप्रीत बुमराहनं जिंकला पॉली उमरीगर पुरस्कार, बक्षीस रक्कम किती मिळाली? जाणून घ्या (PTI)

Jasprit Bumrah BCCI Naman Award 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने अनेक प्रसंगी घातक कामगिरी केली आहे. बुमराहने प्रत्येक फॉरमॅटमध्ये चमत्कार दाखवला आहे. त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठ्या पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

बुमराह याची वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे. बुमराहला पॉली उमरीगर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यात बुमराहला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बुमराहची २०२३-२४ या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून निवड करण्यात आली आहे. बुमराहची आतापर्यंतची कारकीर्द सर्वोत्तम आहे. त्याने टीम इंडियासाठी कसोटीत २०५ विकेट्स घेतल्या आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १४९ विकेट घेतल्या आहेत. बुमराहने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये ८९ विकेट घेतल्या आहेत. त्याने आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे.

बुमराहला किती बक्षीस रक्कम मिळाली?

पॉली उमरीगर पुरस्कार हा बीसीसीआयच्या सर्वात मोठ्या पुरस्कारांच्या यादीत समाविष्ट आहे. या पुरस्कारासोबत बीसीसीआय रोख बक्षीसही देते. एका वृत्तपत्रातील माहितीनुसार, विजेत्या खेळाडूला या विजेतेपदासाठी १५ लाख रुपये दिले जातात. त्यामुळे बुमराहला रोख बक्षीसही मिळणार आहे.

बुमराहने तिसऱ्यांदा पटकावला हा पुरस्कार

विशेष म्हणजे, बुमराहला तिसऱ्यांदा पॉली उम्रीगर पुरस्कार मिळाला आहे. २०१८-१९ हंगामासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला होता. यानंतर २०२१-२२ मध्येही बुमराहने हा पुरस्कार पटकावला होता. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या