नेपाळ तिरंगी T20I मालिका आजपासून (२७ फेब्रवारी) सुरू झाली आहे. नेपाळच्या कीर्तिपूर येथे नामिबिया आणि नेपाळ यांच्यात पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात नामिबियाने २० धावांनी विजय मिळवला.
तत्पूर्वी, या सामन्यात एक जबरदस्त विक्रम नोंदवला गेला आहे. या सामन्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्वात वेगवान शतक आले आहे.
नामिबियाचा २२ वर्षीय फलंदाज यान निकोल लोफ्टी-ईटन याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले सर्वात वेगवान शतक झळकावले आहे. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन यान निकोल लोफ्टी याने ३३ चेंडूत शतक ठोकले. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ८ षटकार मारले. या वादळी शतकानंतर टी-20 क्रिकेटचे रेकॉर्ड मोडले आहेत.
वास्तविक, नेपाळच्या कुशल मल्लाने एशियन गेम्स २०२३ मध्ये मंगोलियाविरुद्ध ३४ चेंडूत शतक ठोकले होते. हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात जलद शतक ठरले होते. पण आता यान निकोल लोफ्टीने हा विक्रम मोडीत काढला आहे. निकोल लॉफ्टी ईटनने ३३ चेंडूंचा सामना करताना ११ चौकार आणि ८ षटकार मारले. त्याने ३६ चेंडूत १०१ धावा केल्या.
कुशल मल्लानंतर तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड मिलरचे नाव आहे. मिलरने २०१७ मध्ये ३५ चेंडूत शतक केले होते. भारतीय संघासाठी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने श्रीलंकेविरुद्ध ३५ चेंडूत शतक ठोकले होते.
१) यान निकोल लॉफ्टी - ३३ चेंडूत शतक ठोकले (२०२४)
२) कुशाल मल्ला- ३४ चेंडूत शतक ठोकले (२०२३)
३) डेव्हिड मिलर- २५ चेंडूत शतक ठोकले (२०१७)
४) रोहित शर्मा- ३५ चेंडूत शतक ठोकले (२०१७)
प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने २० षटकांत ४ गडी गमावून २०६ धावा केल्या होत्या. नामिबियाकडून मालन कारुगरने ५९ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याशिवाय यान निकोल लॉफ्टी ईटनने १०१ धावांची तुफानी खेळी खेळली. अशा प्रकारे नेपाळ संघाला सामना जिंकण्यासाठी २०७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ १८.५ षटकात १८६ धावांवर ऑलआऊट झाला.