Viral Video : ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा रडीचा डाव; फलंदाज ९८ धावांवर असताना मुद्दामहून वाईड टाकला आणि…-james vince remain not out on 98 runs beacuse bowler deliberate wide in big bash league 2021 video ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video : ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा रडीचा डाव; फलंदाज ९८ धावांवर असताना मुद्दामहून वाईड टाकला आणि…

Viral Video : ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा रडीचा डाव; फलंदाज ९८ धावांवर असताना मुद्दामहून वाईड टाकला आणि…

Aug 27, 2024 04:28 PM IST

९८ धावांवर खेळणाऱ्या फलंदाजाला आपले शतक पूर्ण करता आले नाही. ही घटना तीन वर्षे जुनी आहे, पण बिग बॅश लीगच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या विचित्र घटनेचा व्हिडिओ पुन्हा शेअर करण्यात आला आहे.

James Vince Andrew Tye video : ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा रडीचा डाव, फलंदाज ९८ धावांवर असताना मुद्दामहून वाईड टाकला, व्हिडीओ पाहा
James Vince Andrew Tye video : ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा रडीचा डाव, फलंदाज ९८ धावांवर असताना मुद्दामहून वाईड टाकला, व्हिडीओ पाहा

क्रिकेटच्या मैदानावर अनेक घटना घडतात, ज्या शतकानुशतके स्मरणात राहतात. अशीच एक घटना ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश क्रिकेट लीगमध्ये घडली होती. ही घटना चाहते कधीच विसरणार नाहीत.

एका गोलंदाजाने खेळ भावनेच्या विरोधात कृती केली होती. फलंदाजाला शतकासाठी दोन धावांची गरज असताना गोलंदाजाने वाईड चेंडू टाकला होता. यानंतर गोलंदाजावर प्रचंड टीकाही झाली होती.

९८ धावांवर खेळणाऱ्या फलंदाजाला आपले शतक पूर्ण करता आले नाही. ही घटना तीन वर्षे जुनी आहे, पण बिग बॅश लीगच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या विचित्र घटनेचा व्हिडिओ पुन्हा शेअर करण्यात आला आहे.

वास्तविक, २०२१ च्या बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्स आणि पर्थ स्कॉचर्स यांच्यात सामना खेळला गेला होता. कॅनबेरा येथील क्वालिफायर फायनल सामन्यात, जेम्स व्हिन्स अवघ्या २ धावांनी शतक झळकावू शकला नाही, कारण अँड्र्यू टायने एक बाउन्सर टाकला, जो अंपायरने वाइड घोषित केला.

खरेतर, डॅनियल ह्युजेसने १७व्या षटकात झाय रिचर्डसनच्या शेवटच्या ३ चेंडूंवर तीन चौकार मारले. यानंतर शेटचा चेंडू त्याने ब्लॉक केला. कारण नॉन-स्ट्राइक एंडला उभा असलेला जेम्स विन्स ९८ धावांवर होता.

अशा स्थितीत सिडनी संघाला विजयासाठी १ आणि विन्सला शतकासाठी २ धावांची गरज होती, परंतु गोलंदाज अँड्र्यू टायने बाउन्सर टाकला. हा चेंडू लेग साईडच्या दिशेने फलंदाजाच्या डोक्यवरून गेला. त्यामुळे अंपायर पॉल विल्सन यांनी तो चेंडू वाइड दिला. यानंतर गोलंदाज टाय ताबडतोब माफी मागताना दिसला, पण सामना संपल्यावर हात मिळवण्यापूर्वी दोन्ही खेळाडू काही सेकंद एकमेकांकडे पाहत राहिले.

पर्थ स्कॉचर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात झालेल्या या क्वालिफायर सामन्यात पर्थ स्कॉचर्सने ६ गडी गमावून १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात सिडनी सिक्सर्सने केवळ एक गडी गमावून लक्ष्य गाठले. जेम्स विन्सने ९८ तर ह्युजेसने २१ धावा केल्या.