Gautam Gambhir : केएल राहुलचं नाव मोठं, म्हणून त्याला संघात घेऊ नये, गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य
Gautam Gambhir on kl rahul : इशान किशनने शनिवारी 2023 आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध ८२ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. यानंतर गौतम गंभीरने त्याच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
Gautam Gambhir on Ishan Kishan : वनडे वर्ल्डकपसाठी भारताचा १५ सदस्यीय संघ निश्चित झाला आहे. पण याची अधिकृत घोषणा झालेली नाही. वनडे विश्वचषक संघात केएल राहुलचा समावेश होणार आहे. तर संजू सॅमसनला बाहेर राहावे लागणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
या दरम्यान, माजी क्रिकेटर गौतम गंभीरने एक मोठे वक्तव्य केले आहे. गंभीर म्हणाला की, केएल राहुलच्या जागी इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळायला हवी. तसेच, जर केएल राहुलची स्पर्धा रोहित शर्मा किंवा विराट कोहलीशी असती तर त्याच्या नावाचा विचारही झाला नसता, असेही गंभीर म्हणाला.
इशानने ५व्या क्रमांकावर स्वता:ला सिद्ध केले
इशान किशनने शनिवारी आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध ८२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, जे त्याचे वनडे क्रिकेटमधील सलग चौथे अर्धशतक होते. मात्र, पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना इशान किशनने ही खेळी खेळली, ज्यामुळे त्याने स्वत:ला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून राहुलच्या पुढे असल्याचे सिद्ध केले आहे. दुखापतीमुळे राहुल आशिया चषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळत नाहीये.
नाव मोठं म्हणून राहुला खेळवू नये, फॉर्म बघून निर्णय घ्या
गौतम गंभीर पुढे म्हणाला कीGautam Gambhir on Ishan Kishan , भारताने विश्वचषक संघात मोठ्या नावांचा विचार करण्यापेक्षा फॉर्म आणि परफॉर्मन्सला प्राधान्य दिले पाहिजे. गौतम गंभीर डिस्ने हॉटस्टारवर म्हणाला, "मला सांगा की चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी काय महत्त्वाचे आहे. नाव किंवा फॉर्म? जर रोहित किंवा विराटने अशी कामगिरी केली असती (सलग ४ सामन्यांत अर्धशतकं) तर तुम्ही त्यांच्या जागी केएल राहुलला खेळवायला हवे, असे म्हटले असते का? ."
गंभीर पुढे म्हणाला, "जेव्हा तुम्ही विश्वचषक जिंकण्याची तयारी करत असता, तेव्हा तुम्ही मोठी नावे बघत नाही, तुम्ही फॉर्म बघता आणि त्यांचे मूल्यांकन करता. तुम्ही अशा खेळाडूची निवड करता जो चांगली कामगिरी करू शकेल आणि तुमच्यासाठी विश्वचषक जिंकू शकेल." ."
भारताच्या एकदिवसीय विश्वचषक २०११ च्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गंभीरने म्हटले की, इशान किशनने भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेशी कामगिरी केली आहे. तो म्हणाला, "माझा विश्वास आहे की इशान किशनने सर्व काही केले आहे की त्याला विश्वचषक संघात प्राधान्य दिले जावे. आता फक्त तो इशान किशन आहे आणि त्याने जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत, म्हणून त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवू नये'.