Ishan Kishan : झारखंडने २७ चेंडूत सामना जिंकला, ईशान किशनचे ९ षटकार, ३३४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ishan Kishan : झारखंडने २७ चेंडूत सामना जिंकला, ईशान किशनचे ९ षटकार, ३३४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली

Ishan Kishan : झारखंडने २७ चेंडूत सामना जिंकला, ईशान किशनचे ९ षटकार, ३३४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली

Nov 30, 2024 12:11 PM IST

Ishan Kishan Vs Arunachal Pradesh, SMAT 2024: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) झारखंड आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात झालेल्या सामन्यात इशान किशनने ३३४.७८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत इतिहास रचला. त्याच्या खेळीच्या जोरावर झारखंड संघाने विश्वविक्रमही रचला.

Ishan Kishan : झारखंडने २७ चेंडूत सामना जिंकला, ईशान किशनचे ९ षटकार, ३३४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली
Ishan Kishan : झारखंडने २७ चेंडूत सामना जिंकला, ईशान किशनचे ९ षटकार, ३३४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झारखंडने धावांचा पाठलाग करताना केवळ ४.३ षटकात सामना जिंकला. ईशान किशन याने संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. इशानने ९ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने शानदार नाबाद खेळी खेळली, ज्यासाठी त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) झारखंड आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात झालेल्या सामन्यात इशान किशनने ३३४.७८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत इतिहास रचला. त्याच्या खेळीच्या जोरावर झारखंड संघाने विश्वविक्रमही रचला.

या सामन्यात अरुणचकच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत केवळ ९३ धावा फलकावर ठेवल्या. झारखंडने अवघ्या २७ चेंडूत या धावसंख्येचा पाठलाग केला. इशान किशनने आपल्या खेळीदरम्यान ५ चौकार आणि ९ षटकार ठोकले, त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यादरम्यान इशानसोबत क्रीजवर उपस्थित असलेल्या दुसरा सलामीवीर उत्कर्ष सिंगने ६ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १३ धावा केल्या.

तत्पूर्वी, अरुणाचलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु संघ केवळ ९३ धावांवर बाद झाला आणि एकाही फलंदाजाने १४ पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत. यादरम्यान संघाकडून ११व्या क्रमांकावर खेळणाऱ्या अक्षय जैनने १४ धावांची सर्वात मोठी खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ चौकार आले. संघाचे एकूण ६ फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत.

झारखंडकडून अनुकुल रॉयने सर्वाधिक ४ बळी घेतले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना झारखंड संघाने एकही विकेट न गमावता अवघ्या ४.३ षटकांत विजय मिळवला.

ईशानसह झारखंडनेही महाविक्रम बनवला

इशान किशनने २३ चेंडूत ३३४.७८ च्या स्ट्राईक रेटने ७७ धावा केल्या. स्पर्धेच्या इतिहासातील स्ट्राईक रेटच्या बाबतीत किशनची खेळी कोणत्याही खेळाडूने (ज्याने २० पेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला) सर्वात वेगवान आहे. त्याने अनमोलप्रीत सिंगला (३३४.६१) कमी फरकाने मागे टाकले आहे.

तर ईशाची ही खेळी टी-20 क्रिकेटमधील कोणत्याही भारतीयाची दुसरी सर्वात वेगवान खेळी आहे. या यादी पहिल्या क्रमांकावर सुरेश रैनाचे नाव आहे. सुरेश रैना (३४८) नंतर रैनाने आयपीएल २०१४ च्या क्वालिफायर २ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध २५ चेंडूत ८७ धावांची शानदार खेळी केली होती.

इशान किशनच्या या खेळीसह झारखंडने विश्वविक्रमही केला. अरुणाचल प्रदेशविरुद्ध धावांचा पाठलाग करताना संघाचा रनरेट २०.८८ होता, जो टी-२० क्रिकेटच्या इतिहासात किमान १ षटके खेळणाऱ्या संघांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. झारखंडने याबाबतीत रोमनाियाचा विक्रम मोडला. रोमानियाने २०२१ मध्ये सर्बियाविरुद्ध २०.४७ च्या रनरेटने फलंदाजी केली होती.

झारखंडने मिळवला तिसरा विजय

तिसरा सामना जिंकून झारखंडने क गटात दुसरे स्थान मिळवले आहे. झारखंडने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. संघाला अजून तीन सामने खेळायचे आहेत.

Whats_app_banner